Full Width(True/False)

Redmi K50: युजर्ससाठी गुड न्यूज ! ५१२ GB स्टोरेजसह येणार हा जबरदस्त स्मार्टफोन, मिळतील भन्नाट फीचर्स

नवी दिल्ली: लवकरच चीनमध्ये लाइन-अप सादर करण्याच्या तयारीत असून या सीरिज संबंधी एक महत्त्वाची माहिती लीक झाली आहे. असे सांगण्यात येत आहे की, या सीरीजचा एक प्रकार ५१२ GB स्टोरेजने सुसज्ज असेल. Redmi K50, K50 Pro, K50 Pro + आणि K50 गेमिंग व्हर्जन फोन Redmi K50 सीरीज अंतर्गत लाँच केले जातील. या ४ मॉडेल्स व्यतिरिक्त, कंपनी पाचव्या फोनवर देखील काम करत आहे. ज्याचे, नाव असू शकते. वाचा: सध्या Redmi K50 Super Cup Exclusive Edition बद्दल फार माहिती उपलब्ध झालेली नाही. परंतु, एक लीक सूचित करते की, Redmi K50 Super Cup Exclusive Edition ५१२ GB इंटर्नल स्टोरेजसह येऊ शकते. यासोबतच फोनचे इतर काही फीचर्सही लीक झाले आहेत. या लाइन-अपमधील टॉप-एंड फोनला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ जनरल १ चिपसेट दिला जाण्याची शक्यता आहे. Xiaomi ने चीनमध्ये या चिपसेटसह Xiaomi 12 सीरीज आधीच लाँच केली आहे. Redmi K50 सुपर कप एक्सक्लुझिव्ह एडिशनच्या इतर लीक झालेल्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी ते ड्युअल VC चेंबरने सुसज्ज असेल. हे १२० W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाला देखील सपोर्ट करेल. गेमिंग एडिशन मॉडेल JBL ड्युअल स्पीकर आणि अल्ट्रावाइड-बँड X-axis मोटरने सुसज्ज असण्याची अपेक्षा आहे. फोनमध्ये ६.६७ -इंचाचा OLED २k डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. तसेच, यामध्ये ४७००mAh बॅटरी दिली जाऊ शकते. फोनच्या कॅमेरामध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, १३ मेगापिक्सलचा सेकेंडरी सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा थर्ड लेन्स असू शकतो. फोनमध्ये १६-मेगापिक्सलचा सेल्फी स्नॅपर दिला जाऊ शकतो. फोनमध्ये Android 12-आधारित MIUI १३ ऑपरेटिंग सिस्टम असेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/lHwfoedV2