Full Width(True/False)

पहिल्याच सेलमध्ये धमाकेदार ऑफर! ६४MP कॅमेऱ्यासह येतो Poco चा ‘हा’ फोन, किंमत १३,९९९ रुपयांपासून सुरू

नवी दिल्ली : निर्माता कंपनी ने गेल्या आठवड्यात आपल्या लेटेस्ट मिड-रेंज हँडसेट ला लाँच केले होते. ग्राहकांकडे आजपासून या स्मार्टफोनला खरेदी करण्याची संधी आहे. ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवर हा फोन आजपासून विक्रीसाठी उपलब्ध आहे. या फोनमध्ये मिळणाऱ्या प्रमुख स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे तर फुल एचडी+ डिस्प्ले, मीडियाटेक प्रोसेसर, ६४ मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा आणि १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सारखे फीचर्स दिले आहेत. तुम्ही जर कमी बजेटमध्ये येणारा फोन शोधत असाल तर हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. फोनच्या किंमत आणि फीचर्सबद्दल जाणून घेऊया. वाचा: POCO M4 Pro: किंमत आणि ऑफर्स POCO M4 Pro स्मार्टफोनला तीन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. या फोनच्या बेस व्हेरिएंट ६ जीबी + ६४ जीबी स्टोरेजची किंमत १४,९९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १६,४९९ रुपये आहे. फोनचे टॉप व्हेरिएंट ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह येते. याची किंमत १७,९९९ रुपये आहे. विशेष म्हणजे इंट्रोडक्टरी ऑफर अंतर्गत ग्राहक फोनला स्वस्तात खरेदी करू शकतात. फोनला एचडीएफसी डेबिट/क्रेडिट कार्ड वापरून खरेदी केल्यास १ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल. अशाप्रकारे या फोनला तुम्ही फक्त १३,९९९ रुपये सुरुवाती किंमतीत खरेदी करू शकता. Poco M4 Pro स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स Poco M4 Pro स्मार्टफोनमध्ये ६.४३ इंच एमोलेड डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल आणि रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. यामध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलिया जी९६ प्रोसेसरसह ८ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबीपर्यंत स्टोरेज मिळते. फोनच्या स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १ टीबीपर्यंत वाढवू शकता. स्मार्टफोन अँड्राइड ११ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. Poco M4 Pro स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ६४ मेगापिक्सल प्रायमरी सेंसर, ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि २ मेगापिक्सल मॅक्रो सेंसरचा समावेश आहे. तर फ्रंटला १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरचा सपोर्ट दिला आहे. तर पॉवर बॅकअपसाठी ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/XGbmD9q