Rasik Dave Death: प्रसिद्ध चित्रपट आणि टीव्ही अभिनेते रसिक दवे यांचे २९ जुलै रोजी निधन झाले. रसिक दवे यांच्या निधनानंतर मनोरंजन इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या कुटुंबियांसाठी तर हा मोठा धक्का होता. या दु:खद घटनेनंतर रसिक यांची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री केतकी दवे यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. पतीच्या निधनानंतर केतकी दवे यांनी एक मुलाखत दिली असून त्यामध्ये त्या पतीच्या आठवणीत भावुक झाल्या. गेली काही वर्षे त्यांच्यासाठी किती कठीण आणि वेदनादायी होती, याबाबतही त्यांनी माहिती दिली. केतकी दवे यांच्या आई आणि अभिनेत्री सरिता जोशी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांचा जावई म्हणजेच रसिक दवे डायलिसिसवर होते. रसिक दवे यांना किडनीशी संबंधित समस्या होती. केतकी दवे यांनी बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत असे म्हटले की, 'रसिक यांना त्यांच्या आजाराबद्दल कधीच बोलावेसे वाटायचे नाही. ते एक खूप प्रायव्हेट व्यक्ती होते आणि त्यांना वाटायचे की सर्व काही ठीक होईल. पण त्यांची तब्येत बरी नाही हे आम्हाला माहीत होतं.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/wlOGsaF