Prequel and Sequel in Indian Movies: 'बाहुबली', 'केजीएफ', 'भुलभुलैय्या', 'सिंघम' आणि मराठीमध्ये 'टाइमपास' अशा काही निवडक यशस्वी सिनेमांच्या फ्रेंचाईजी मनोरंजनसृष्टीत आहेत. या सिनेमांचा विशिष्ट प्रेक्षकवर्ग आहे. निर्माते आणि दिग्दर्शकांच्या हाती जणू सिक्वेलच्या निमित्तानं हुकमी एक्का लागलेला असतो. पण, या सर्व सिनेमांना एकाच तराजूत मोजता येणार नाही. ते एकमेकांपेक्षा वेगळे आहेत. सिक्वेलच्या बाबतीत सर्वव्यापी विचार केल्यास हॉलिवूडच्या पडद्यावरील 'मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स' आणि 'डीसी'चे सिनेमे अग्रस्थानी आहेत. पण, आता हा सिक्वेलचा सिलसिला दाक्षिणात्य सिनेमे, बॉलिवूड आणि मराठीतही तितकाच हिट होताना दिसतोय. सुपरहिट सिनेमाचे दोन किंवा त्याहून अधिक चित्रपट प्रदर्शित झाले असतील तर त्या चित्रपटांना सीरिज किंवा फ्रेंचाइजी असं संबोधलं जातं. 'केजीएफ २', 'गोलमाल ४', 'मुंबई पुणे मुंबई ३', 'टाइमपास ३', 'दे धक्का २' या सिनेमांना फ्रेंचाइजी अथवा सीरिज म्हटलं जातं. इतकंच नव्हे तर सिनेमांचे सर्वच प्रकार फ्रेंचाइजी या प्रकारात मोडतात. सिक्वेल, प्रिक्वेल, क्रॉसओव्हर, स्पिनऑफ आणि रिबूट हे प्रकार फ्रेंचाइजीशी संबंधित आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hiXUvA