Full Width(True/False)

प्रसाद ओकला वाटतोय लेकाचा अभिमान; दहावीच्या परिक्षेत मिळवले 'इतके' टक्के

मुंबई: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यातल्या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता याच्या मुलाला देखील दहावीच्या परिक्षेत चांगलं यश मिळालं आहे. प्रसादनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत लेकाच्या यशाचा आनंद चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 'चि. मयंक ओक...!! १०वी परीक्षेत ९०% अभिमान आणि प्रेम', अशी पोस्ट करत प्रसादनं त्याचा आनंद व्यक्त केलाय. प्रसादनं ही आनंदाची गोष्ट शेअर केल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी त्याचं प्रसादच्या मुलाचं अभिनंदन केलं आहे. प्रसादच्या या पोस्टवर अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं.. 'आई शप्पथ... खूप अभिनंदन', असं म्हटलं आहे. तर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांनं माझा मोबाइल पण इतके टक्के चार्ज होत नाही, अशी मजेशीर कमेंट केली आहे. राज्यातल्या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली. एकूण ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण बोर्डाची टक्केवारी सर्वाधिक आहे. राज्यातील ८,३६० शाळांचा निकाल १०० टक्के लागलेला आहे. एकूण १७ लाख ९ हजार २६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी १५ लाख १ हजार १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्यावर्षी निकाल सटकून आपटला होता. २००६ सालानंतरचा तो सर्वाधिक कमी निकाल होता. नवा अभ्यासक्रम हे त्यामागचं कारण मानलं जात होतं. गेल्या दोन-तीन वर्षात अंतर्गत मूल्यमापनही झालं नव्हतं. यंदा मात्र निकालाने उसळी घेतली. गतवर्षीच्या तुलनेत निकालात १८.२० टक्के वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gbQndk