मुंबई: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल काल म्हणजेच २९ जुलै रोजी जाहीर करण्यात आला. सिनेसृष्टीतील अनेक बालकलाकारांनी या परिक्षेत चांगलं यश मिळलं आहे. 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकलेल्या याला दहावीच्या परिक्षेत तब्बल ९०.६०% इतके गुण मिळाले आहेत. खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. दिवेशनं मालिकेत लहानपणीचे शंभूराजे साकारले होते. त्यानं त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. दहावीच्या परिक्षेत मिळालेल्या या यशासाठी त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. तसंच 'एलिझाबेथ एकादशी' या चित्रपटात झेंडुची भूमिका साकारलेली बालकलाकार हिला तब्बल ९८ टक्के गुण मिळाले आहेत. चित्रपटात ती गणितात कच्ची होती. मात्र दहावीच्या खऱ्याखुऱ्या परिक्षेत गणित विषयात तिला ९६ गुण मिळाले आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/339DDR2