संजना पाटील, कॉलेज क्लब रिपोर्टर आणि यांची '' ही मालिका आठवतेय? त्यात जोगतिणीच्या व्यक्तिरेखेनं लक्ष वेधून घेतलं होतं. अभिनेत्री उर्मिला काटकरनं साकारलेली ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली. उर्मिला पुन्हा एकदा त्याच भूमिकेत आणखी एका नव्या मालिकेत दिसतेय. '' या मालिकेतून ती जोगतिणीची भूमिका साकारतेय. मालिकांमध्ये मुख्य भूमिकांच्या बरोबरीनं विविध प्रकारच्या व्यक्तिरेखा दिसत असतात. त्यातल्या काही विशेष ठसा उमटवून जातात. अभिनेत्री उर्मिला काटकरची 'तुला पाहते रे' या मालिकेतली जोगतिणीची भूमिका ही अशीच होती. संदेश पोहोचवणं, अडचणीच्या वेळी मदतीला धावून जाणं, योग्य तो मार्ग दाखवणं हे करताना ती दिसली. तिचा पेहेराव, बोलण्याची शैली आणि अभिनय या गोष्टींनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. आता पुन्हा एकदा 'आई माझी काळूबाई' या मालिकेत ती तशाच भूमिकेत आहे. खरं तर त्याच पद्धतीची भूमिका येणं आणि पुन्हा त्यावर काम करणं तिला रुचत नव्हतं. सुरुवातीला तिनं विचार केला, की पुन्हा तशाच प्रकारच्या भूमिकेवर काम करणं योग्य असेल का? परंतु या भूमिकेवर विश्वास ठेवून आणि प्रेक्षकांनी केलेलं कौतुक पाहून ती पुन्हा एकदा ही जोगतिणीची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाली. शूटिंगच्या आठवणी सांगताना उर्मिला म्हणाली, की 'अनेकदा सेटवर शूटिंग संपल्यानंतर प्रेक्षक भेटण्यासाठी गर्दी करत. 'तुला पाहते रे' या मालिकेच्या शूटिंगदरम्यान अशाच दोन-चार बायका आल्या आणि अक्षरशः पाया पडू लागल्या. 'तुम्ही फार सुंदर अभिनय करता, तुमच्याकडे पाहून खूप सकारात्मक वाटतं आणि हिंमत वाढते' असं त्या म्हणाल्या.' आई काळूबाईवर उर्मिलाचीही श्रद्धा आहे. या भूमिकेनं मला ओळख दिली आणि जगण्यासाठी नवी उमेद दिली. काळूबाईचं दर्शन मी अद्याप घेतलेलं नाही. आता या मालिकेच्या निमित्तानं लवकरच दर्शन घेईन असं वाटतंय. या भूमिकेनं मला खूप काही दिलं. प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. पुन्हा एकदा तशाच पद्धतीच्या भूमिकेसाठी उत्साहानं आणि जिद्दीनं काम करतेय. - उर्मिला काटकर (अभिनेत्री)
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Hl4twH