Full Width(True/False)

पॉपस्टार मॅडोना करणार स्वतःच्याच बायोपिकचे दिग्दर्शन

मुंबई :बॉलिवूडमध्ये जीवनपटांची मोठी लाट नुकतीच येऊन गेली. आता जगप्रसिद्ध स्वतःच्याच बायोपिकचे लेखन आणि दिग्दर्शन करणार आहे. ऑस्कर विजेता लेखक डियाब्लो कोडी हा या चित्रपटाचे सहलेखन करणार आहे. न्यू यॉर्कमधील झोपडपट्टीतून आलेल्या मॅडोनाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील बनण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार आहे.या चित्रपटाची निर्मिती युनिव्हर्सल पिक्चर्सच्या डोन्ना लँगले आणि ऍमी पास्कल हे करत आहेत. या चित्रपटाचं नाव, चित्रीकरणाच्या तारखा आणि कास्टही अद्याप ठरली नाही. माध्यमांशी बोलताना मॅडोना म्हणते, 'एक कलाकार, गायिका, नृत्यांगना आणि एक माणूस म्हणून माझा एकूणच प्रवास मला जगासमोर मांडायचा आहे. हा चित्रपट अर्थातच संगीतावर केंद्रित असेल. संगीतानंच मला जगण्याची आणि पुढे जात राहण्याची प्रेरणा दिली आहे. आयुष्यात कित्येक अशा घटना घडल्या आहेत ज्या मी कोणाला सांगितल्या नाहीत आणि ज्या प्रेरणादायी आहेत. माझ्या आयुष्यातील घटना या माझ्याहून चांगल्या रितीने कोण मांडू शकेल? माझ्या आयुष्याचा प्रवास हा एक रोलर-कोस्टर राईडसारखा राहिला आहे आणि मला तो सर्वांना दाखवायचा आहे.' मॅडोना आपल्या पाच दशकांच्या कारकीर्दीमध्ये एक पॉप आयकॉन म्हणून उदयास आली. पॉप संस्कृती समृद्ध करण्यात मोठ्या प्रमाणात योगदान दिलं आहे, असं मत युनिव्हर्सल पिक्चर्सच्या लँगले यांनी व्यक्त केले आहे. मॅडोनाने यापूर्वी दोन चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे. 'फिल्थ अँड विस्डम' आणि 'डब्ल्यू. ई.' या चित्रपटांचं दिग्दर्शन तिनं केलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2FIt51u