मुंबई: बॉलिवूड अभिनेता याच्या मृत्यूचं कारण अद्यापही समोर आलं नसलं तर सीबीआय, ईडी आणि एनसीबीकडून कसून तपास सुरू आहे. सुशांतच्या निधनाला तीन महिने उलटून गेले असले तरी त्याच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी हळुहळू समोर आहेत. सुशांतच्या फार्महाऊससंदर्भात देखील अनेक गोष्टींचा खुलासा झाला असून याच फार्म हाऊसच्या मॅनेजरने धक्कादायक माहिती दिली आहे. सुशांतच्या फार्महाऊसचा मॅनेजर पवन याची सीबीआयच्या टीमकडून नुकतीच चौकशी करण्यात आली. या चौकशीत त्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यानं सुशांतची गर्लफ्रेंड संदर्भातही अनेक गोष्टी सांगितल्या. रिया सुशांतच्या अकाऊंटमधील पैशांचा वापर स्वत:साठी आणि पार्टी करण्यासाठी करत असे, तसंत रियाचा भाऊ शौविकहीलाही अनेकदा ड्रग्ज घेताना पाहिल्याचं पवननं सांगितलं आहे. सुशांतच्या आयुष्यात रिया आल्यानंतरच त्याची मॅनेजर श्रुती मोदी ही २०१९ पासून फार्महाऊसवर येऊ लागली होती. रिया आयुष्यात आल्यानंतर फार्महाऊसवरच्या पार्ट्यांमध्ये वाढ झाल्याचं त्यानं पवननं सांगितलं. गेल्या वर्षी रियाच्या वाढदिवसाच्या एक दिवसआधी रिया आणि तिचं कुटुंबिय देखील फार्महाऊसवर आलं होतं. रियाने फार्महाऊसवरील केलेल्या पार्टीचा खर्च पाहून सुशांत तिच्यावर काहीसा नाराज होता. असा खुलासा पवनने केला आहे. दरम्यान, टाइम्स नाऊने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, त्यांच्याकडे सुशांतसिंह राजपूत च्या बँक अकाउंटचे स्टेटमेन्ट आहेत. यात सुशांतच्या पावना लेक फार्महाऊसच्या पार्टीमध्ये ४० हजारांपेक्षा जास्त खर्च झालेला दिसत आहे. २९ मार्च रोजी फार्महाऊसवर 'छिछोरे' ची सक्सेस पार्टी करण्यात आली होती. या पार्टीत बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या पार्टीत ड्रग्ज वापरल्याचा आरोप एनसीबीने केला आहे. यामुळंच आता या पार्टींचा तपास करण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार एनसीबीच्या टीमने सुशांतच्या फार्महाऊसवर छापा टाकला. यात त्यांना फार्महाऊसमधून हुक्काची भांडी, औषधं, अॅशट्रे आणि इतर सामान मिळालं. सुशांत या जागेसाठी दरमहा २.५ लाख रुपये देत होता. तसंच अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास एनसीबी करत आहे. त्यानुसार समीर वानखेडे यांनी एकाचवेळी मुंबई आणि गोव्यात कारवाई केली. वानखेडे यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'ला सांगितले की, 'या कारवाईत अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधून करमजीत याला ताब्यात घेण्यात आलं आहे. सुशांतसिंह व रिया चक्रवर्ती यांना सुशांतच्या घरी तसंच हॉटेलवर अनेकदा गांजा आणि चरसचा पुरवठा केला जात होता. या पुरवठ्याचा सर्वात मोठा दलाल करमजीत होता. त्याखेरीज प्रभादेवी भागातून ड्युएन नावाच्या इसमालाही ताब्यात घेण्यात आले आहे. हे सर्व जण टोळीने अमली पदार्थांचा पुरवठा सातत्याने करत होते, असे समोर आले आहे.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2EgktyQ