नवी दिल्लीः कोट्यवधी युजर्स असलेल्या मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsappचा वापर जगभरात केला जातो. व्हॉट्सअॅपमध्ये आलेल्या चॅटिंगला किंवा प्रत्येक कॉन्टॅक्टच्या मेसेजला उत्तर देणे गरजेचे आहे, असे नाही. परंतु, काही नोटिफिकेशन्स त्रासदायक ठरतात. अनेकदा ऑफिस किंवा फॅमिली ग्रुपमध्ये तुम्हाला अॅड केले जाते. त्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या बऱ्याच मेसेज तुमच्यासाठी खास असत नाहीत. त्यामुळे नोटिफिकेशन्स म्यूट करण्याचा पर्याय दिला आहे. परंतु, आता यात एक मोठा बदल करण्यात आला आहे. वाचाः Whatsapp शी संबंधित अपडेट शेयर करणाऱ्या WABetaInfo कडून युजर्सला लवकरच Whatsapp वर बाकीच्या युजर्संला नेहमीसाठी म्यूट करू शकतील. आता पर्यंत युजर्संना ८ तास, एक दिवस, किंवा एका वर्षासाठी युजर्स किंवा ग्रुपला म्यूट करता येवू शकत होते. परंतु, आता नवीन ऑप्शन या लिस्टमध्ये जोडले गेले आहे. याचे नाव Mute Always ठेवण्यात आले आहे. सध्या बीटा युजर्स सोबत या फीचरला टेस्ट केले जात आहे. पुढील काही आठवड्यात हे सर्वांना मिळू शकते. वाचाः अँड्रॉयड बीटा व्हर्जनमध्ये फीचर अँड्रॉय़ड अॅपच्या बीटा व्हर्जन 2.20.201.10 मध्ये हे फीचर पाहिले गेले आहे. याच्या मदतीने युजर्स कोणत्याही कॉन्टॅक्टला किंवा ग्रुपला नेहमीसाठी म्यूट करू शकतील. म्यूट करण्यात आल्यानंतर कॉन्टॅक्ट किंवा ग्रुप मेसेज आल्यावर नोटिफिकेशन्स मिळाले नसले तरी ओपन केल्यानंतर ते मेसेज वाचले जावू शकतात. सध्या अँड्रॉयड अॅप बीटा व्हर्जनमध्ये खूप दिवसांपासून याची टेस्टिंग केली जात आहे. तसेच लवकरच हे सर्व युजर्संना मिळणार आहे. वाचाः अशी बदलली जाणार सेटिंग्स म्यूटचे ऑप्शनची खूप आधीपासून युजर्संना उत्सूकता आहे. कोणत्याही युजर्संना ब्लॉक न करता त्यांच्या मेसेजचे नोटिफिकेशन्सची सुट्टी करण्याचे नवीन फीचरच्या मदतीने करता येवू शकते. कोणत्याही चॅट किंवा ग्रुपला म्यूट करण्यासाठी त्याला ओपन करा. टॉप राइटमध्ये लिहिलेल्या 'Mute Notifications' ऑप्शनवर टॅप करा. नवीन फीचर्स मिळाल्यानंतर ८ तास, १ दिवस किंवा एक वर्षाऐवजी always चे ऑप्शन दिसेल. त्याला सिलेक्ट करा. त्यानंतर तात्काळ हे नोटिफिकेशन्स येणे बंद होतील. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2I5uu3q