मुंबई: बॉलिवूड अभिनेता याची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आहे. वयाच्या ५० व्या वर्षी त्याचं आज निधन झालं. बंगळुरू येथील रुग्णालयात फराजनं अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री हिनं फराजच्या आजाराबद्दल सोशल मीडियावर माहिती शेअर करत त्याला आर्थिक मदत करावी, अशी विनंतही केली होती. अखरे आज त्याची प्राणज्योत मालवली. आज ट्विट करत फराजचं निधन झाल्याची बातमी पूजानं शेअर केली. ' सांगताना दु:ख होतंय की अभिनेता फराज खान याचं आज निधन झालं . तुम्ही सर्वांनी त्याला आर्थिक मदत केली आणि त्याच्या आरोग्यासाठी देवाकडं प्रार्थना केली त्याबद्दल तुमचे आभार’असं पूजा भट्ट हिनं तिच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून फराज कर्करोगाशी झुंज देत होता. त्याला झाल्याचं निदान झालं होतं. तिसऱ्या टप्प्यातील कर्करोग असल्यानं त्याच्यावर बंगळुरूतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारांसाठी मोठा खर्च होणार होता. पण त्याच्याकडं इतके पैसे नसल्यानं पूजानं चाहत्यांना शक्य ती मदत करण्याचं आवाहन केलं होतं.पूजानं आवाहन केल्यानंतर अभिनेता सलमान खान याच्या संस्थेकडून फराजला आर्थिक मदत करण्यात आली होती. रुग्णालयाचं बिल सलमानच्या संस्थेकडून भरण्यात आलं होतं. अशी माहिती आहे. १९९६ साली प्रदर्शित झालेल्या ‘फरेब’ या चित्रपटातून फराज खान यानं बॉलिवूडमध्ये करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यानं 'पृथ्वी', दुल्हन बनू में तेरी, चाँद बुझ गया, अशा अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. तसंच सोबत त्यानं ‘’या चित्रपटात साकारलेली भूमिका विशेष चर्चेत आली होती. वन प्लस वन, शूsssss कोई है, रात होने को , अशा अनेक मालिकांमधूनही तो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3enHZr8