मुंबई- बॉलिवूड अभिनेता करोनाकाळात गरजूंसाठी कोणत्याही देवाहून कमी नव्हता. लॉकडाउन दरम्यान, त्याने हजारो लोकांना स्वखर्चाने त्यांच्या घरी पोहचवण्याची जबाबदारी त्याने आपल्या खांद्यावर घेतली. या प्रवासादरम्यान त्याने गरजुंच्या खाण्या- पिण्याचीही सोय केली होती. एवढंच नाही तर शेकडो लोकांना रोजगार देण्याचं कामही त्याने केलं. त्याच्या याच गुणांमुळे लोकांनी त्याला 'मसीहा' म्हणून संबोधायला सुरुवातही केली. आता ताज्या बातम्यांनुसार सोनू आणखी काही चांगलं काम करणार आहे. यासाठी त्याने आपल्या एकूण आठ मालमत्ता तारण ठेवून १० कोटी रुपयांचं कर्ज घेतलं आहे. सोनू आणि त्याची पत्नी आहेत या मालमत्तेचे मालक मनी कन्ट्रोल डॉट कॉमच्या अहवालानुसार सोनूने आपली दोन दुकानं आणि सहा फ्लॅट तारण ठेवले आहेत. सोनू आणि त्याची पत्नी सोनाली या मालमत्तांचे मालक आहेत. असं असलं तरी स्वतः सोनूने या बातमीवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सोनूने करोना काळात केली हजारो लोकांना मदत सोनू सूद ट्विटरवर सक्रिय असून सोशल मीडियावर गरजूंशी सतत बोलताना दिसतो. याशिवाय त्याने हेल्पलाईन क्रमांकही शेअर केला आहे. यापूर्वी त्याने पंजाबमधील पॅरामेडिकल कर्मचार्यांना १५०० पीपीई किट आणि पोलीस अधिकाऱ्यांना २५ हजार फेस शील्ड दिल्या आहेत. याशिवाय अनेकांवर उपचार आणि लॉकडाउनच्या काळात घरापासून दूर अडकलेल्यांना सोनू सूदने चार्टर्ड प्लेनमधून घरी सुखरूप पोहोचवले आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2JEs64V