Full Width(True/False)

पैशांसाठी लग्नात गाणी गायचा दिलजीत दोसांज; आज आहे कोट्याधीश!

मुंबई: शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानं तसंच कंगनासोबतच्या ट्विटरवॉरमुळं अभिनेता सध्या चर्चेत आला आहे. अनेक बॉलिवूड चित्रपटांमधून दिलजीतनं प्रेक्षकांची मनं जिंकली असली तरी त्याची या क्षेत्रातील सुरुवात बॉलिवूड नव्हे तर पंजाबी सिनेसृष्टीतून झाली आहे. त्याला 'किंग्ज ऑफ पंजाबी फिल्म्स' असंही म्हणतात. सिनेसृष्टीत आल्यानंतर दिलजीतनं कधीही मागं वळून पाहिलं नाही. पण त्यापूर्वीचा त्याचा संघर्ष काही सोपा नव्हता. पंजाबच्या एका खेड्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या दिलजीत सिंह याचा दिलजीत दोसांज पर्यंतचा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा असाच आहे. आर्थिक परिस्थितीमुळं शिक्षण अर्धवट सोडावं लागल्यानं दिलजीत लग्नात, मंदिरांमध्ये गाणी गायचा. यातून तो पैसे मिळवत होता. पहिला ब्रेक २००४मध्ये दिलजीतला पंजाबी अल्बमध्ये गाण्याची पहिल्यांदा संधी मिळाली. या संधीचं त्यानं सोनं केलं. 'इश्क दा उडा अडा' हा त्याचा पहिला अल्बम होता. या अल्बमलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर त्यानं मागं वळून पाहिलं नाही. 'द लायन ऑफ पंजाब' या चित्रपटातून त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर त्यानं अनेक चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'गूडन्यूज' या चित्रपटातील दिलजीतच्या अभिनयाचं कौतुक झालं होतं. महागड्या कपड्यांची आहे हौस पंजाबी सिनेसृष्टीचा स्टार असलेल्या दिलजीतच्या आजच्या संपत्तीचा आकडाही मोठा आहे. महागडे आणि परदेशी ब्रॅन्डचे कपडे परिधान करण्याची त्याला हौस आहे. अनेक मुलाखतीतं त्यानं याबद्दल सांगितलं आहे. शेतकऱ्यांना दिली एक कोटींची देणगी सुरुवातीपासूनच शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे . दिलजीतनं काल सिंधू सीमा (हरियाणा-दिल्ली सीमा) गाठली आणि तिथं त्यानं शेतकऱ्यांशी संवाद साधला. उबदार कपडे विकत घेता यावेत आणि थंडीत रात्री थोडा आराम मिळावा यासाठी दिलजित दोसांज यानं शेतक्यांना १ कोटी रुपयांची देणगी दिली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2L3UFc6