मुंबई- केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ करत आहेत. या आंदोलनासाठी शेतकऱ्यांना सिनेसृष्टीतूनही मोठा पाठिंबा मिळत आहे. आतापर्यंत पंजाबी सिनेसृष्टीतील स्टार्सनी शेतकऱ्यांचं पूर्णपणे समर्थन केलं आहे. आता भोजपुरी सिनेमाचे स्टारही शेतकऱ्यांच्या समर्थनात पुढे आले आहेत. भोजपुरी अभिनेता खेसारीलाल यादव यानेही शेतकऱ्यांच्या बाजूने आपली भूमिका मांडत ट्वीट केलं आहे. दोन दिवसांपूर्वी शेतकरी चळवळीला पाठिंबा देणारा गायक- अभिनेता दिलजीत दोसांज आणि अभिनेत्री यांच्यात ट्विटरवर बरीच बाचाबाची झाली. अगदी थोड्याच वेळात दोघांमधल्या भांडणाने व्यापक रूप घेतलं. देशभरात त्यांच्या वादाची चर्चा झाली होती. त्या वादानंतर अनेकांनी दिलजीतला पाठिंबा दिला तर कंगनालाही काहींनी पाठिंबा दिला. अशात भोजपुरी स्टार खेसारीलाल यादव याने कंगनाच्या विरोधात विधान केलं आहे. खेसारीलाल यादव याने आपल्या अधिकृत ट्विटक अकाउटवरून ट्वीट करत कंगनाला लक्ष्य केलं. या ट्वीटमध्ये खेसारीने लिहिले की, 'ए भाई, ई कंगना के कुछ न बुझाई! न समझ आवे आम, न बुझाये मूली...अ खाली हर बात पे जुबान खूली... किसान लोगिन के आज सबके साथ के जरुरत बा, सब गोटा मिल के बोलीं: जय जवान-जय किसान! बाकी सब के खेसारी के प्रणाम बा।' खेसारीच्या या ट्वीटचा अर्थ असा की कंगनाला काहीही समजत नाही, तिला फक्त सर्व गोष्टींवर बोलता येतं. यावेळी, शेतकऱ्यांना आपली गरज आहे. म्हणून सर्वांनी एकत्र बोलायला हवं जय जवान जय किसान. खेसारीचं हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याच्या या ट्वीटवर अनेकजण प्रतिक्रियाही देत आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mORiDV