Full Width(True/False)

'४४वर्षांनतरही ‘आरण्यक’मधील संवाद ७० ते ८० टक्के पाठ होते'

मुंबई: मराठी सिनेसृष्टीतल ज्येष्ठ अभिनेते यांचं आज निधन झालं. ते ८३ वर्षांचे होते. ८३व्या वर्षीही त्यांची काम करण्याची ऊर्जा उल्लेखनीय अशीच होती. अभिनयासोबतही त्यांच्या फिटनेसबद्दलही तरुण कलाकारांना नेहमीच आकर्षण वाटत होतं. 'अग्गंबाई सासू' बाई ही त्यांची शेवटची मालिका ठरली. तर ‘’ नाटकामध्ये धृतराष्ट्राची भूमिका साकारत होते. ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरीलिखित 'आरण्यक' हे नाटक तब्बल ४४ वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आलं. ४४ वर्षांपूर्वी पटवर्धन यांनी धृतराष्ट्राची भूमिका साकारली होती. नाटक पुन्हा रंगभूमीवर आल्यानंतरही त्यांनी तिच भूमिका साकारली होती. याचा अनुभव त्यांनी एका मुलाखतीत सांगितला होता. 'मी ४४ वर्षापूर्वी हे नाटक केलं होतं तेव्हा ‘धृतराष्ट्र’ भूमिकेचा खूप विचार केला होता. मात्र, त्यानंतर आता खूप काळ लोटलाय. या काळात माझ्या ज्ञानातही खूप भर पडली आहे. 'आरण्यक'बाबत विचारणा झाली तेव्हा, समोरून काम आल्यानं मी होकार कळवला होता. यापूर्वी नाटक केल्यामुळं आकर्षण होतंच. ४४ वर्षापूर्वी संवाद पाठांतरावर मेहनत घेतली होती. पुन्हा नाटक करण्याबाबत विचारणा झाल्यानंतर मी सहज म्हणून संवाद म्हणून पाहिले. हे संवाद अजूनही ७० ते ८० टक्के पाठ आहेत, हे माझ्या लक्षात आले.' असं पटवर्धन यांनी सांगितलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gh8oI8