मुंबई- देशभरातील शेतकरी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत असून त्यांच्या मागण्या मान्य करण्यास सांगत आहेत. यावेळी सर्वत्र शेतकरी आंदोलनाचीच चर्चा आहे आणि अनेकजण यावर आपला अभिप्रायही देताना दिसत आहेत. एकीकडे संपूर्ण पंजाब सिनेसृष्टी शेतकरी आंदोलनाला पुढे येऊन पाठिंबा देत आहे. आता बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटी या आंदोलनावर आपली भूमिका मांडताना दिसत आहेत. रितेश देशमुखनेही शेतकऱ्यांचं समर्थन करणार ट्वीट यावेळी केलं आहे. याने केलं ट्वीट शनिवारी रितेश देशमुखने ट्वीट करत म्हटलं की, 'जर तुम्ही आज जेवत असाल तर त्याबद्दल शेतकर्याचे आभार माना. मी आपल्या देशातील प्रत्येक शेतकऱ्यांसोबत एकजुटने उभा आहे.' यासह अभिनेत्याने #जयकिसान लिहिले. लोक त्याच्या या निर्णयाचं कौतुक करत आहेत. स्वतः रितेश देशमुख अनेकदा देशातील महत्त्वपूर्ण प्रश्नांवर आपलं मत मांडताना दिसतो. शेतकऱ्यांच्या समर्थनात बॉलिवूड आणि पंजाबी सेलिब्रिटी बॉलिवूड आणि पंजाब सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. सोनू सूद, गुरदास मान, गिप्पी ग्रेवाल, हनी सिंग, कपिल शर्मा, स्वरा भास्कर, वीर दास, तापसी पन्नू यांच्यासह अनेक स्टार सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाजूने बोलताना दिसत आहेत. कंगना रणौत आणि दिलजित दोसांज यांच्यात झाला वाद शेतकरी आंदोलनावरून कंगना रणौत आणि दिलजीत दोसांज यांच्यात ट्विटर युद्ध सुरू झालं होतं. कंगनाने आंदोलनातील एका वृद्ध महिलेचम वर्णन सीएए प्रोटेस्टच्या बिलकिस बानो म्हणून केलं. तसंच ही आज्जी १०० रुपयांसाठी अनेक आंदोलनात जात असते असा आरोपही तिने आपल्या ट्वीटमधून केला. यानंतर दिलजित दोसांज याने महिंदर कौर नावाच्या आज्जीचा व्हिडिओ शेअर केला आणि संपूर्ण सत्य सांगितलं. यानंतर कंगना आणि दिलजीत यांच्यात ट्विटरवर बाचाबाची सुरू झाली होती. या प्रकरणात अनेकांनी दिलजीतला पाठिंबा दिला.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/37zZQIu