Full Width(True/False)

सशस्त्र सेनांच्या नियमांचं पुन्हा उल्लंघन, वायूसेनेचा आक्षेप

मुंबई- नुकताच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मने सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला. या सिनेमात मुख्य भूमिकेत असून, त्यांनी हवाई दलाच्या अधिकाऱ्याची भूमिका वठवली आहे. नेमकी याच सीनवर भारतीय हवाई दलाने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. यावर आपलं मत मांडताना त्यांनी हे सीन सिनेमातून काढून टाकण्यास सांगितलं आहे. वायुसेनेच्या म्हणण्यानुसार या सीनमध्ये हवाई दलाचा गणवेश योग्य प्रकारे दाखवण्यात आलेला नाही. या सिनेमात अनिल कपूरसह मुख्य भूमिकेत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरबद्दल ट्वीट करताना वायुसेनेने स्पष्ट शब्दात म्हटलं की, या सीनमध्ये अनिल कपूर यांनी वायूसेनेचा गणवेश चुकीच्या पद्धतीने घातला आहे. याशिवाय गणवेशात असताना त्यांच्या तोंडची भाषाही चुकीची आहे. सशस्त्र दलात अशी वागणूक नियमांविरूद्ध असून हा सीन सिनेमातून काढून टाकण्याची गरज आहे. नेटफ्लिक्सवर येत असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन विक्रमादित्य मोटवानी याने केलं आहे. येत्या २४ डिसेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्सवर वायूसेनेने आक्षेप घेण्याची ही काही पहिली वेळ नाही, याआधीही, वायूसेनेने जान्हवी कपूर स्टारर 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' या सिनेमावर आक्षेप घेतला होता. या सिनेमात वायू दलातील पुरुष अधिकाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3n2rLHF