Full Width(True/False)

'श्रीरामच राहिल हिरो', सैफ अली खानने 'रावण' वक्तव्यावर मागितली माफी

मुंबई- बॉलिवूड अभिनेता याने एका मुलाखतीदरम्यान त्याच्या आगामी ‘’ या सिनेमातील ‘रावण’ भूमिकेबद्दल सांगितलं. यादरम्यान त्याने रावणाबद्दल एक वक्तव्य केलं ज्यामुळे तो गोत्यात आला. सोशल मीडियावर त्याच्या सिनेमावर बहिष्कार टाकण्याची चर्चा होऊ लागली. प्रकरण चिघळत असल्याचं पाहून आता सैफने माफी मागितली आहे. सैफ अली खानने दिलगिरी व्यक्त करत दिली प्रतिक्रिया सैफ अली खानने आपल्या एका निवेदनात म्हटलं की, 'माझ्या एका मुलाखतीदरम्यान मी जे बोललो त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याचं मला कळलं. त्यांच्या भावना दुखावण्याचा माझा मुळीच हेतू नव्हता. मी माझं विधान मागे घेत आहे आणि दिलगिरी व्यक्त करतो. श्रीराम माझ्यासाठी नेहमीच नायक राहिले आहेत. आदिपुरुष म्हणजे वाईटावर विजय मिळवण्याचा उत्सव. आमची संपूर्ण टीम ही उत्कृष्ट कथा पडद्यावर आणण्याच्या कामात व्यग्र आहे. सैफ अली खानने काय केलं होतं विधान सैफ अली खानने आपल्या मुलाखतीत म्हटलं होते की, 'अशा राक्षसी राजाची भूमिका साकारणं मनोरंजक आहे. परंतु आम्ही त्याला दयाळू दाखवू. यात सीतेचं अपहरण करणं न्यायाला धरून असल्याचं दाखवू आणि रावणाची रामासोबतची लढाई ही सूडाची लढाई दाखवण्यात येईल. जी रावणाने लक्ष्मणाने त्याच्या बहिणीचा सूपर्णकेचं नाक कापल्यामुळे लढली होती.' भाजप नेते राम कदम यांनी आक्षेप घेतला सैफ अली खानच्या या वक्तव्यानंतर भाजप नेते राम कदम म्हणाले की, सध्या हिंदूंच्या भावना दुखावणाऱ्या कथा आणि सीन सिनेमांमध्ये दाखवणं हा सिनेसृष्टीचा ट्रेण्ड झाला आहे. राम कदम यांनी स्पष्ट केलं की यापुढे ते हिंदू धर्माचा अपमान सहन करणार नाहीत. दिग्दर्शक ओम राऊतचा 'आदिपुरुष' सिनेमा दिग्दर्शक ओम राऊत याचा ‘आदिपुरुष’ हा पुढील सिनेमा आहे. यात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास रामाची भूमिका साकारणार आहे. तर सैफ अली खान लंकाधिपती रावणाची भूमिका साकारणार आहे. सिनेमाचं चित्रीकरण अद्याप सुरू झालं नाही . पण ११ ऑगस्ट २०२२ रोजी सिनेमा प्रदर्शित करण्याचा टीम विचार करत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mPmTWh