Full Width(True/False)

'तांडव' सीरिजच्या पहिल्या भागातल्या १७ व्या मिनिटाला असं काय आहे?

मुंबई- दिग्दर्शक अली अब्बास जफर दिग्दर्शित '' ही सीरिज अधिकाधिक वादात अडकताना दिसत आहे. स्टारर ही वेब सीरिज शुक्रवारी अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली. रिलीजच्या दिवसापासूनच या सीरिजवर आक्षेप घेण्यात आला आहे आणि सीरिजवर बंदी घालण्याचीही मागणी केली जात आहे. दरम्यान, ‘तांडव’ च्या पहिल्या भागाच्या १७ व्या मिनिटावर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.'तांडव' वेब सीरिजच्या पहिल्या एपिसोडमध्ये दाखवण्यात आलं आहे की, अभिनेता युनिव्हर्सिटीच्या कार्यक्रमात शिवाच्या वेशात दिसतो. झीशन युनिव्हर्सिटीतल्या विद्यार्थ्यांना म्हणतो की, तुम्हाला कोणापासून स्वातंत्र्य पाहिजे आहे. दरम्यान, नारदाच्या वस्त्रात असलेला अजून एक विद्यार्थी झीशानला म्हणतो की, 'नारायण-नारायण. देव काहीतरी कर. भगवान रामाचे अनुयायी सोशल मीडियावर सतत वाढत असतात.''मला वाटतं आपणही काही नवीन राजनीती केली पाहिजे. यावर झीशान म्हणतो की, "मी नक्की काय करू.. स्वतःचा फोटो बदलू का?" यावर नारद म्हणतो की 'भोलेनाथ तू फारच साधा आहेस. काहीतरी नवीन ट्वीट करा. काहीतरी खळबळजनक काही प्रक्षोभक. जसे, कॅम्पसमधील सर्व विद्यार्थी गद्दार झाले आहेत आणि स्वातंत्र्यांचे नारे लगावत आहेत.' यानंतर जीशान अयूब म्हणतो की, 'स्वातंत्र्य आणि मग बीपचा आवाज येतो.' जीशान नारद वेशात असलेल्या कलाकाराला म्हणतो की, 'जेव्हा मी झोपायला गेलो होतो तेव्हा स्वातंत्र्य एक छान गोष्ट होती आणि आता वाईट झाली का?' यानंतर जीशान विद्यार्थ्यांना म्हणतो, 'तुम्हाला कशापासून स्वातंत्र्य पाहिजे आहे?' यावर, विद्यार्थी म्हणतात की उपासमार, सरंजामशाही, जातीवाद आणि भ्रष्टाचारापासून मुक्ती आवश्यक आहे. मग झीशान म्हणतो की, 'याचा अर्थ असा नाही की देशापासून स्वातंत्र्य नकोय तर देशात राहून स्वातंत्र्य हवं आहे. यांना सांगा जगा आणि जगू द्या.'राजकीय ड्रामा असलेल्या ‘तांडव’ वेब सीरिजमध्ये , डिंपल कपाडिया, दिनो मोरिया, तिग्मांशू धुलिया, झीशान अय्यूब, सुनील ग्रोव्हर आणि गौहर खान यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अ‍ॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज रिलीज करण्यात आली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2XNfjAq