संपदा जोशी ० '' या मालिकेतलं सासूची व्यक्तिरेखा वेगळी आणि सकारात्मक आहे, प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया कशा आहेत? - सकारात्मक आणि चांगल्या प्रतिक्रिया आहेत. इतर सासू किंबहुना काही सासवा कदाचित जाच करतही असतील. पण माझ्या मालिकेतल्या सासूसारखी आताच्या काळातली, चांगली, समजूतदार प्रेम करणारी सासूही जगात आहे. माझं पात्र हे त्या सासूंचं प्रतिबिंब आहे, असं प्रेक्षकांना वाटतं. ० तुम्ही साकारलेल्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. याबद्दल काय वाटतं ? - मी साकारलेल्या व्यक्तिरेखा स्त्रियांचीच निरनिराळी रूपं आहेत. माझं पात्र चांगलं होण्यासाठी मी खूप मेहनत घेते. पात्रांमधून मध्यमवर्गीय महिलांच्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करते. मध्यमवयीन व्यक्तिरेखाही तितक्याच महत्त्वाच्या असतात. आजुबाजूला बघितलेल्या गोष्टींचं निरीक्षण करून मी त्या व्यक्तिरेखा साकारते. त्यामुळे प्रेक्षकांना ते जवळचं वाटतं. ० मालिका हे माध्यम आवडीचं आहे का? चित्रपटात फारसं न दिसण्याचं कारण?- हो. मला मालिका आवडतात. मालिकेमुळे तुम्ही थेट प्रेक्षकांच्या घरात पोहोचता. चित्रपटांसाठी सुंदर किंवा वेगळ्या भूमिका माझ्या वाट्याला आल्या नाहीत. याची मला खंत आहे. मी चार-पाच वर्षं एक हिंदी मालिकाही केली. त्याच दरम्यान काही चांगल्या मराठी चित्रपटांसाठी विचारलं गेलं. पण वेळेअभावी मला ते स्वीकारता आलं नाही. ० नकारात्मक भूमिका साकारायला आवडेल का?- '' या मालिकेतलं आईसाहेब हे पात्र नकारात्मक भूमिकेच्या जवळ जाणारं होतं. कलाकार म्हणून मला सर्व प्रकारच्या भूमिका साकारता यायला हव्यात. पण माझ्यासाठी नकारात्मक भूमिकेचा फार कोणी विचार करत नाही. ० सध्याच्या मालिकांविषयी तुमचं मत काय?- चांगल्या मालिका सुरू आहेत. पूर्वी मराठी मालिकेवरून हिंदी मालिका केल्या जायच्या. त्याला साहित्यिक मूल्य होतं. काही वेळा हिंदी मालिकांची उगाच नक्कल केली जाते. एखाद्या कादंबरीवर, नाटकावर किंवा विशिष्ट लेखनावर मालिका याव्यात. आपल्याकडे खूप चांगलं साहित्य आहे. ० नाटकात पुन्हा कधी दिसणार?- 'साखर खाल्लेला माणूस' या नाटकातलं माझं पात्र प्रेक्षकांना आवडलं होतं. परवा मी टॅक्सीने प्रवास करताना त्या टॅक्सी चालकाने 'नाटकाचा पुन्हा प्रयोग कधी' असं विचारलं. तुम्हाला कसं माहिती? असं विचारल्यावर तो म्हणाला, 'मी तुमचं नाटक तीन वेळा बघितलं आहे.' हे ऐकून मला छान वाटलं. सध्या तरी मी महिन्यातले सगळेच दिवस व्यग्र आहे. पण या वर्षात कदाचित एखादं नाटक करेन. ० तुमची फॅशन स्टाइलची सोशल मीडियावर चर्चा असते...- ही अभिरुची मला माझ्या आईकडून मिळाली आहे. तिला निरनिराळ्या प्रकारच्या साड्या नेसायला आवडायचं. माझे वडील देखील स्टाइलिश राहायचे. मोहनलाही या सगळ्याची आवड होती. त्यामुळे माझीही एक वेगळी स्टाइल असावी, असं मला नेहमी वाटतं. साडी, त्याला शोभून दिसणारे दागिने असं मला आवडतं. ० अभिनयाव्यतिरिक्त इतर छंद कोणते?- घर आवरणे, वेगवेगळे पदार्थ करून बघणे, वाचन करणे. चित्रपट वगैरे फार बघायला आवडत नाहीत. त्यापेक्षा मी शांत बसू शकते किंवा चालायला जाऊ शकते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2MptkBL