Full Width(True/False)

भारतात Poco C3 स्मार्टफोनने मोडले विक्रीचे सर्व रेकॉर्ड, २४ जानेवारीपर्यंत डिस्काउंट

नवी दिल्लीः भारतात Poco C3 स्मार्टफोनला चांगले पसंत केले जात आहे. या स्मार्टफोनची विक्री १० लाख यूनिट झाली आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये या बजेट स्मार्टफोनला देशात लाँच करण्यात आले होते. जूनमध्ये मलेशियात लाँच झालेल्या Redmi 9C चे थोडे टिव्कड व्हर्जन होते. Poco C3 स्मार्टफोन असा आहे ज्याने भारतात लाँचिंगनंतर अवघ्या ३ महिन्यात एक लाख विक्रीचा आकडा पार केला होता. सध्या या फोनवर २४ जानेवारीपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. वाचाः Poco C3 वर मिळतोय डिस्काउंट Poco C3 स्मार्टफोनवर डिस्काउंट दिला जात आहे. स्मार्टफोनच्या ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज फोनची किंमत ६ हजार ९९९ रुपये आहे. तर पोको सी ३ च्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ७ हजार ९९९ रुपये आहे. या दोन्ही फोनच्या किंमतीवर ५०० रुपयांचा डिस्काउंट फ्लिपकार्टवर दिला जात आहे. HDFC Bank कार्ड्स द्वारे ग्राहक १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट मिळू शकतो. भारतात पोको सी ३ च्या ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनला ७ हजार ४९९ रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. तर याच्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनला ८ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. या स्मार्टफोनच्या किंमतीत जानेवारीत कपात करण्यात आली आहे. यानंतर ८ हजार ४९९ रुपये झाली आहे. वाचाः Poco C3 चे वैशिष्ट्ये पोकोच्या या फोनमध्ये ६.५३ इंचाचा एचडी (720x1,600 पिक्स्ल) डिस्प्ले दिला आहे. या स्मार्टफोन मध्ये ऑक्टा-कोर MediaTek Helio G35 SoC चिप दिली आहे. ४ जीबी रॅम दिला आहे. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला आहे. ज्यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5,000mAh बॅटरी दिली आहे. १० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2NnP5T7