नवी दिल्लीः Infinix ने आपला लेटेस्ट बजेट स्मार्टफोन Infinix Smart 5 भारतात आज लाँच केला आहे. Infinix Smart 5 एक बजेट फोन असून यात मीडियाटेक हीलियो जी २५ प्रोसेसर यासारखे खास फीचर्स दिले आहेत. फोनला सिंगल रॅम आणि स्टोरेज व्हेरियंटवर उपलब्ध करण्यात आले आहे. जाणून घ्या Infinix Smart 5 स्मार्टफोनसंबंधी सर्वकाही. वाचाः Infinix Smart 5 ची किंमत इनफिनिक्स स्मार्ट ५ ला देशात ७ हजार १९९ रुपये किंमतीत लाँच केले आहे. या फोनला १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता फ्लिपकार्टवर उपलब्ध करण्यात येणार आहे. हँडसेटला पर्पल ब्लू, ग्रीन आणि ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येऊ शकते. वाचाः Infinix Smart 5 चे खास फीचर्स या फोनमध्ये ६.८२ इंचाचा एचडी प्लस (1640 x 720 पिक्सल) डिस्प्ले दिला आहे. स्क्रीन चा आस्पेक्ट रेशियो 20.5:9 आहे. तसेच Eye Care Mode सपोर्ट दिला आहे. फोनला २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज मध्ये लाँच केले आहे. स्टोरेजला मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. हँडसेटमध्ये मीडियाटेक हीलियो जी २५ प्रोसेसर दिला आहे. वाचाः Infinix Smart 5 फोन अँड्रॉयड १० वर काम करतो. फोनला पॉवर देण्यासाठी 6000mAh बॅटरी दिली आहे. स्मार्टफोनमध्ये कनेक्टिविटीसाठी 4G VoLTE, जीपीएस, जीपीआरएस, ब्लूटूथ 5.0, वाय-फाय यासारखे फीचर्स दिले आहेत. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर, एम्बियंट लाइट सेंसर, G-सेंसर, प्रॉक्सिमिटी सेंसर, जायरोस्कोप आणि ई-कंपास सारखे फीचर्स दिले आहेत. फोनमध्ये फोटोग्राफीसाठी १३ मेगापिक्सलचा प्रायमरी तसेच लो लाइट सेन्सर सोबत ड्यूअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2MVH9sj