मुंबई- दाक्षिणात्य चित्रपटातील लोकप्रिय अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या लग्नाला १६ वर्ष पूर्ण झाली. २००५ साली लग्नबंधनात अडकलेल्या या दोघांची प्रेम कहाणी कोणत्याही परी कथेपेक्षा कमी नाही. चित्रपटसृष्टीत जिथे लग्नाच्या अनेक वर्षानंतर नावाजलेल्या जोड्याही वेगळ्या होतात, तिथे या जोडीतील प्रेम दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. नम्रताने १९९३ मध्ये 'फेमिना मिस इंडिया' हा किताब जिंकला होता. यानंतर तिने अभिनेता सलमान खानसोबत 'जब प्यार किसीसे होता है' चित्रपटात काम केलं. हा नम्रताचा पहिला चित्रपट होता. नम्रता आणि महेश बाबूची पहिली भेट २००० मध्ये आलेल्या तेलगू चित्रपट 'वामसी' च्या चित्रीकरणादरम्यान झाली. 'वामसी' च्या सेटवर महेश आणि नम्रता एकमेकांच्या प्रेमात पडले. परंतु, तेव्हा दोघांनी याबाबतीत कोणतंही पाऊल उचललं नाही. चित्रीकरणानंतर बराच वेळ ते दोघं एकत्र घालवू लागले. चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण होईपर्यंत ते दोघेही एकमेकांना डेट करू लागले होते. असं असलं तरी मीडियासमोर त्यांनी या नात्याचा कधी स्वीकार केला नाही. एवढंच नाही तर, महेशने त्यांच्या नात्याबद्दल घरीसुद्धा काहीचं सांगितलं नव्हतं. महेशने सर्वप्रथम याबद्दल त्याच्या बहिणीला सांगितलं आणि त्याच्या बहिणीने नम्रताच्या घरातल्यांना या लग्नासाठी तयार केलं. १० फेब्रुवारी २००५ मध्ये त्यांनी लग्न केलं. लग्नाआधी जवळपास ५ वर्ष ते दोघं एकमेकांना डेट करत होते. हे लग्न दाक्षिणात्य पद्धतीने करण्यात आलं. लग्नात महेशने पांढरा सदरा आणि धोतर नेसलं होतं तर नम्रतानेही पांढरी आणि हिरव्या रंगाची साडी नेसली होती. नम्रता महेशपेक्षा ४ वर्ष मोठी आहे परंतु, जेव्हा प्रेम होतं तेव्हा वयाचा विचार केला जात नाही. त्या दोघांना गौतम आणि सितारा ही दोन मुलं झाली. काही दिवसांपूर्वी त्यांच्या नात्यात सर्व गोष्टी नीट नसल्याच्या चर्चा होत होत्या. पण त्या अफवा असल्याचं नर्मताने सांगितलं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3d2b7pl