Full Width(True/False)

रोज ५ रुपयांपेक्षा कमी खर्चात ३६५ दिवसांची वैधतेचे Airtel आणि Vi प्लान्स पाहा

नवी दिल्लीः Airtel vs Vodafone Idea (Vi) Prepaid Plans: तुम्हाला डेटा कमी आणि जास्त वैधता असलेले रिचार्ज प्लान हवे असतील तर आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी ही खास माहिती देत आहोत. १५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे एअरटेल आणि वोडाफोन आयडियाच्या खास प्लान संबंधी माहिती देत आहोत. या प्लानमध्ये ३६५ दिवसांची वैधता ऑफर केली जाते. जाणून घ्या या प्लानंसंबंधी... वाचाः वोडाफोन आयडियाचा १४९९ रुपयांचा प्लान १५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत हा प्लान वर्षभराची म्हणजेच ३६५ दिवसांची वैधता देतो. या प्लानध्ये युजर्संना २४ जीबी डेटा दिला जातो. तसेच सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. तसेच ३६०० एसएमएस दिले जाते. अन्य बेनिफिटमध्ये व्हीआय मूव्हीज अँड टीव्हीचे फ्री अॅक्सेस दिले जाते. या प्लानचा रोजचा खर्च फक्त ४.१० रुपये आहे. वाचाः एअरटेलचा १४९८ रुपयांचा प्लान एअरटेलच्या या प्लानसोबत एक वर्षाची वैधता ऑफर केली जाते. या प्लानमध्ये केवळ २४ जीबी डेटा दिला जातो. कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ३६०० एसएमएस ऑफर केले जातात. या प्लानचा रोजचा खर्च ४.१० रुपये आहे. वाचाः अन्य बेनिफिट्स वोडाफोन आयडियाच्या प्लानमध्ये युजर्संना केवळ एकच बेनिफिट मिळते. परंतु, एअरटेलच्या प्रीपेड प्लानमध्ये पूर्ण ६ बेनिफिट्स मिळतात. यात फ्री हेलोट्यून्स Airtel Xstream Premium, विंक म्यूझिक, १ वर्षासाठी Shaw Academy चे फ्री ऑनलाइन कोर्स आणि FasTag खरेदीवर १०० रुपयांचा कॅशबॅक ऑफर दिला जातो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3tZLdbS