मुंबई: ग्रेटासह पॉप गायिका , अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची भाची आणि लेखिका मीना हॅरिस यांच्यासह काही आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर शेतकरी आंदोलनच्या बाजूने ट्वीट केले होते. सोशल मीडियावर आंदोलनावरून संघर्ष सुरू असताना माजी क्रिकेटपटू याने, भारत काय आहे ते भारतीयच जाणतात आणि भारताचे काय करायचे ते भारतीयच ठरवतील, असे ट्विट केले. यात बाहेरच्यांनी पडू नये, असेही त्याने नमूद केले. ‘भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड होऊच शकत नाही,’ असेही त्याने ट्वीटमध्ये म्हटले आहे. सचिनच्या या ट्विटनंतर मराठी सिनेसृष्टीतील दिग्दर्शक यांनी सचिनवर टीका केली आहे. 'सचिनची बॅटींग बघत लहानाचा मोठा झालो! तो माझ्यासाठी क्रिकेटचा देव होता! आयुष्यात अनेक निराश क्षणी मी त्याच्या इनिंग्ज बघायचो, खूप बरं वाटायचं. त्याच्या अनेक गोष्टी मनाला पटल्या नाहीत पण हे कधी बदललं नव्हतं. पण आता मात्र इथून पुढे सगळं वेगळं असेल.राग येतोचं पण वाईट जास्त वाटतंय', असं समीर विध्वंस यांनी त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. सचिवर टीका केल्यानंतर विध्वंस यांनाही टीकेला सामोरं जावं लागलं आहे. त्यांनाही नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं आहे. त्यामुळं समीर यांनी रिप्लायचा पर्याय बंद करणं पसंत केलं आहे. 'मी सभ्य भाषेत माझी मतं मांडतो. सभ्य भाषेतच मांडत राहणार! तरीही त्यावर अर्वाच्य भाषेत अंगावर धाऊन येतात लोक.म्हणून रिप्लाय बंद करावे लागतात. माझ्या मतांशी सहमत नका होऊ, आग्रह नाहीचे. पण सभ्यता का सोडता?! मग अश्यांना ब्लॉक करावं लागतं. आणि ते मी करणार! सभ्यपणे मतमतांतरं असूदेत की',असंही समीर यांनी म्हटलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/39NE2vm