Full Width(True/False)

मलायकासोबत कॅमेऱ्यात कैद झाला अर्जुन, चाहत्यांनी केलं कौतुक

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री मागच्या बऱ्याच काळापासून तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. अरबाज खानशी घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोरा सध्या अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. काही दिवसांपूर्वीच हे दोघांच्या आउटिंगचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. हे दोघं नुकतेच वांद्रे येथे एकत्र दिसले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये मलायकाला तिच्या कारपर्यंत सोडताना दिसला. एवढंच नाही तर त्यानं तिच्यासाठी कारचा डोअर सुद्धा उघडून दिला. मलायका-अर्जुनचा हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेक युजर्स अर्जुनचं कौतुक करताना दिसत आहेत. मलायका आणि अर्जुनचा हा व्हिडीओ पाहिल्यावर त्याच्या चाहत्यांनी त्यानं अशाप्रकारे मलायकाची काळजी घेतल्याचं पाहून त्याचं कौतुक केलं आहे. अनेक युझर्सनी या दोघांना क्यूट कपल म्हटलं आहे. पण काहींना मात्र अर्जुनचा हा अंदाज आवडलेला नाही. त्यांनी 'आई आणि मुलाची जोडी' असं म्हणत दोघांचीही खिल्ली उडवली आहे. तर काहींनी अर्जुनला दुसरी गर्लफ्रेंड शोधण्याचा सल्ला दिला आहे. तर काही युझर्सनी मलायका-अर्जुनला ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे. 'ते दोघं जर एकमेकांसोबत खूश आहेत तर त्यांना खूश राहू द्या' असं या युझर्सचं म्हणणं आहे. मागच्या काही वर्षांपासून अर्जुन आणि मलायकाच्या अफेअरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत असते. दोघंही कधी एकत्र फिरायला जातात तर कधी अर्जुन मलायकाच्या घरी दिसून येतो. त्यामुळे हे दोघं लवकरच लग्नाच्या बेडीत अडकतील असं बोललं जात आहे. मात्र यावर हे दोघंही कोणतीही प्रतिक्रिया देणं नेहमीच टाळताना दिसले आहेत. मात्र सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दोघंही एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसतात.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3aZSNKZ