मुंबई: दिग्दर्शक अनुराग कश्यपनं नुकतीच त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिग्दर्शकाची व्यक्तीरेखा साकारताना दिसणार आहे. असं या चित्रपटाचा टीझर पाहिल्यावर लक्षात येतं. या चित्रपटाचा टीझर १२ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजून १२ मिनिटांनी रिलीज करण्यात आला. ज्यात चित्रपटाची पहिली झलक दाखवण्यात आली आहे. विक्रमादित्य मोटवानीच्या 'एके वर्सेज एके' या चित्रपटात अनिल कपूर यांच्यासोबत दिग्दर्शकाची व्यक्तीरेखा साकारणारा अनुराग या चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नूसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटाचं नाव 'दो बारा' असं असून त्याचं शूटिंग काही दिवसांपूर्वीच गोव्यात सुरू करण्यात आलं आहे. 'दो बारा' या चित्रपटाचा टीझर शुक्रवारी रिलीज झाला. ज्यात मध्यरात्री काही स्क्रिप्ट वाचत असताना दिसते. त्यानंतर ती अलेक्साला त्यावेळच्या क्लायमेट बद्दल विचारते आणि मग स्मार्ट टीव्हीवर कोणतातरी अतरंगी चित्रपट लावण्यास सांगते. त्यानंतर टीव्हीवर चित्रपट सुरू होतो आणि स्क्रीनवर अनुराग कश्यप दिसतो. या दोघांमध्ये असं बोलणं सुरू होतं जसं की दोघंही एकमेकांच्या समोर बसून बोलत आहेत. तेवढ्यात अनुराग तिला टेबलवरील स्क्रिप्ट वाचण्यास सांगतो आणि ती त्याला चित्रपटाचं नाव विचारते. तर तो म्हणतो वेळ पाहा. आत्ताची घड्याळातील वेळ हीच चित्रपटाचं नाव आहे आणि चित्रपटाचं नाव हीच आत्ताची वेळ आहे. त्यावेळी घड्याळात २ वाजून १२ मिनिटं झालेली असतात. म्हणजेच 'दो बारा' अनुरागच्या या चित्रपटाची निर्माती आहे. या चित्रपटाची निर्मिती ती तिच्या नव्या प्रोडक्शन हाऊसच्या नावाने करणार आहे. याआधी एकता आणि अनुरागनं 'उडता पंजाब' आणि 'लुटेरा' या चित्रपटांसाठी एकत्र काम केलं आहे. एकता कपूरकडून दिलेल्या सूचनेमध्ये असं म्हटलं आहे की, 'हे नवीन प्रोडक्शन हाऊस अशा लेखक आणि दिग्दर्शकांसाठी असणार आहे. ज्यांना बोल्ड विषयांवरील कथा मोठ्या पडद्यावर मांडायची आहे.' याआधी एकतानं बोल्ड कथा मोबाइलवर दाखवण्यासाठी अल्ट बालाजी अॅप लॉन्च केलं होतं. नव्या चित्रपटाबद्दल बोलताना अनुराग कश्यप सांगतो, 'या चित्रपटातून आम्ही प्रेक्षकांसाठी नवी कथा घेऊन येत आहोत आणि यासाठी मी खूपच उत्सुक आहे. तापसीसोबत माझा हा तिसरा चित्रपट आहे. यावेळी आम्ही थ्रिलरसोबतच एक चांगली कथा सुद्धा प्रेक्षकांसमोर सादर करण्याचा प्रयत्न करत आहोत.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3amekOZ