मुंबई: भारतात सुरू असलेलं हे सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरलं आहे. आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानानं याबाबत ट्वीट करताच जगभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळायला सुरुवात झाली. ‘आपण याबाबत का बोलत नाही #FarmerProtest’ असं ट्वीट रिहानानं केलं होतं. रिहानाच्या या ट्वीटवर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींच्या प्रतिक्रिया आल्या. बॉलिवूड स्टार अक्षय कुमार, अजय देवगण, सुनील शेट्टी, करण जोहर यांनी देखील रिहानाच्या या ट्वीटवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्री कंगना रणौत तर सर्वात आधी रिहानाच्या ट्वीटवर आपली प्रतिक्रिया दिली होती. ज्यात तिनं रिहानाला मूर्ख असं संबोधलं होतं. तर इतर बॉलिवूड स्टार्सनी सर्वांना एकजूटीनं राहण्याचं आवाहन करत रिहाना किंवा भारताबाहेरील ज्यांची याबाबत प्रतिक्रिया दिली होती तो देशाच्या विरोधात एक खोटा प्रपोगेंडा असल्याचं म्हटलं होतं. हे सर्व ट्वीट देशात चर्चेचा विषय ठरत असतानाच आता अभिनेत्री तापसी पन्नूनं देखील याबाबत आपलं मत मांडलं आहे. तापसीच्या मते जर एक ट्वीटमुळे देशाच्या एकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असेल तर आपल्याला विचार करण्याची गरज आहे. तिचं हे ट्वीट सध्या खूप व्हायरल होताना दिसत आहे. तापसीनं तिच्या ट्वीटमध्ये लिहिलं, ‘जर एका ट्वीटमुळे देशाच्या एकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असेल, एखाद्या मस्करीमुळे तुमच्या विश्वासाला तडा जात असेल, एका शोमुळे तुमच्या धार्मिक भावनांवर परिणाम होत असेल. तर मग तुम्हाला इतरांचे प्रपोगेंडा टिचर होण्यापेक्षा तुमचा स्वःवर असलेला विश्वास आणखी अधिक मजबूत करण्याची गरज आहे.’ तापसीचं हे ट्वीट सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे. याआधी अक्षय कुमारनं या आंदोलनासंदर्भात सरकारच्या भूमिकेला समर्थन देत लिहिलं होतं, ‘शेतकरी निश्चितच आपल्या देशाचा महत्त्वपूर्ण भाग आहेत. त्यांच्या प्रत्येक समस्येचा उपाय शोधण्याचं काम आपलं सरकार करत आहे आणि आपण आपल्या सरकारला पाठिंबा द्यायला हवा. आपण त्यांच्यासोबत उभं राहायला हवं. जे लोक आपल्या देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत अशा लोकांचं आपण समर्थन करणं चुकीचं आहे. #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda.’ याशिवाय अभिनेता अजय देवगणनं देखील याबाबत ट्वीट केलं होतं- 'भारत किंवा भारतीय धोरणांविरूद्ध कोणत्याही चुकीच्या प्रचाराला बळी पडू नका. ही वेळ आपण एकत्र उभं राहण्याची आहे'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2YW4P2t