मुंबई: नवीन मालिकेच्या प्रोमोत त्याची वेळही कळली की सर्वाधिक चर्चा होते ती त्या वेळी लागत असलेल्या आधीच्या मालिकेची. झी वाहिनीवरील प्रेक्षकांच्या आवडत्या मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. '' या गाजलेल्या मालिकेचा तिसऱ्या पर्वाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला. त्यामुळं ''ही मालिका आता शेवटच्या टप्प्यात आल्याचं म्हटलं जात आहे. तसंच काही दिवसांपूर्वी अभिनेता शशांक केतकरच्या आगामी मालिकाचीही घोषणा करण्यात आली आहे. ‘पाहिले न मी तुला’ मालिकेच्या माध्यमातून तो छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. त्यामुळं 'लाडाची मी लेक गं' ही मालिकाही प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं नक्की झालं आहे. तसंच '' या मालिकेतही सध्या अनेक ट्विट्स आणि टर्न्स पाहायला मिळतायत. यात काही बदल होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसंच 'अग्गंबाई सासुबाई' मालिकाही आता वेगळ्याच वळणावर आली आहे. त्यामुळं या दोन मालिकांमध्ये पुढं काय होणार की या मालिकांनाही आता नारळ दिला जाणार याकडं प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Zo1sBt