Full Width(True/False)

WhatsApp मध्ये येतेय हे जबरदस्त फीचर, Facebook प्रमाणे होणार Log Out

नवी दिल्लीः WhatsApp ने आपले आयुष्य पूर्णपणे बदलले आहे. सर्वात आधी आपण लिहून आपल्या भावना व्यक्त व्हायचो, त्यानंतर टेक्स्ट मेसेज आले. परंतु, इंटरनेटच्या सुविधेमुळे यात खूप बदल झाला आहे. इंटरनेट नंतर इंस्टेंट मेसेजिंग अॅप्स आले. त्यांनी मेसेज पाठवण्याची संपूर्ण पद्धतच बदलून टाकली आहे. इंस्टेंट मेसेजिंग अॅप्समध्ये सर्वात लोकप्रिय व्हॉट्सअॅप आहे. वाचाः आज व्हॉट्सअॅप आपल्या आवश्यक गरजेपैकी एक आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. व्हॉट्सअॅपने नवीन प्रायव्हसी पॉलिसी आणली आहे. यानंतर अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी दुसरीकडे पर्याय शोधणे सुरू केले आहे. आतापर्यंत व्हॉट्सअॅपचे असे होते की, यायचा रस्ता आहे. परंतु, जाण्याचा रस्ता नव्हता. म्हणजे सोशल मीडिया साइट फेसबुक आदीमध्ये आपण ऑनलाइनसाठी लॉगिन करतो आणि ऑफलाइन जाण्यासाठी लॉग इट करतो. त्याच प्रमाणे आता याचा वापर व्हॉट्सअॅपमध्ये करण्याची शक्यता आहे. जोपर्यंत तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये ऑनलाइन राहायचे तोपर्यंत लॉगिन राहणार आहे. व्हॉट्सअॅपमध्ये नेहमीसाठी लॉगिन राहते. फोनमध्ये इंटरनेट ऑन असेल तर तुम्हाला मेसेज किंवा कॉल येऊ शकतात. त्यावर काहीही बंधन नाही. आता व्हॉट्सअॅप लोकांना ब्रेक देण्यासाठी एक नवीन फीचर जोडत आहे. वाचाः व्हॉट्सअॅप चे नवीन लॉग आउट फीचर मिळालेल्या माहितीनुसार, युजर्संला व्हॉट्सअॅपमध्ये एक नवीन लॉग आउट फीचर मिळणार आहे. या फीचर्सची अनेक दिवसांपासून मागणी होती. व्हॉट्सअॅपच्या सर्व युजर्संना फोनमध्ये इंटरनेट सुविधा असल्यास २४ तास अॅक्टिव राहतात. त्यानंतर लागोपाठ मेसेज आल्यानंतर फोनवर लक्ष जाते. इंटरनेट बंद असल्यानंतर मेसेज येत नाहीत. आता व्हॉट्सअॅपवरून डिलीट अकाउंटचा पर्याय हटवला जाणार आहे. व्हॉट्सअॅप बीटा व्हर्जन मध्ये नवीन लॉगआउट फीचरला समावेश करण्यात आले आहे. व्हॉट्सअॅपचे नवीन लॉग आउट फीचर व्हॉट्सअॅप मेसेंजर आणि व्हॉट्सअॅप बिझनेस व्हर्जनमध्ये दिले आहे. हे अॅपल युजर आणि अँड्रॉयड युजर्स दोन्हींना मिळणार आहे. हे अजून अधिकृतपणे रोलआउट करण्यात आले नाही. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZrCLnu