Full Width(True/False)

वयाच्या ६५ व्या वर्षीही सुपरफिट आहेत अनुपम खेर, पाहा फोटो

मुंबई: बॉलिवूड अभिनेता नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असतात. कोणत्याही सामाजिक किंवा राजकिय मुद्द्यावर ते बेधडकपणे आपलं मत मांडताना दिसतात. याशिवाय ते सोशल मीडियावरही बरेच सक्रिय आहेत. अनेकदा ते त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात जे चर्चेचा विषय ठरतात. आताही त्यांनी असेच काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यातून त्यांनी वय हे फक्त एक नंबर आहे हे दाखवून दिलं आहे. ६५ वर्षीय अनुपम खेर यांनी नुकतंच त्यांच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात त्यांचा फिटनेस पाहायला मिळत आहे. वयाच्या ६५ व्या वर्षीही अनुपम खेर यांचा फिटनेस मात्र एखाद्या तरुणालाही लाजवेल असाच आहे. त्यांनी हे फोटो शेअर करताना लिहिलं, 'जो स्वतः कधीच हार मानत नाही त्या व्यक्तीला हरवणं सर्वात कठीण आहे. मी बरोबर करत आहे ना मित्रांनो?' काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत अनुपम खेर यांनी सांगितलं होतं, आपल्या करिअरच्या काळात मी अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या पण आता मला बॉलिवूडसोबतच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चित्रपटांमध्येही काम करायचं आहे. मी आणखी जास्त काम करू इच्छितो. मी सध्या ते काम करत आहे. जे मला नेहमीच करायची इच्छा होती. येत्या काळात मला काही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चित्रपटांमध्ये काम करायचं आहे. अनुपम खेर यांनी मागच्या वर्षी एक पुस्तकही प्रकाशित केलं होतं. ज्यात त्यांनी करोनासह मागच्या काही वर्षांमधील घटनांचा उल्लेख केला होता. दरम्यानच्या काळात अनुपम खेर, त्यांची आई दुलारी खेर, भाऊ राजू खेर यांना करोनाची लागण झाली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3sftvzh