मुंबई: काही दिवसांपासून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारा 'द कपिल शर्मा शो' चर्चेत आहे. कपिल शर्मा दुसऱ्यांदा बाबा झाला असून कुटुंबासाठी वेळ मिळावा यासाठी त्यानं हा शो काही महिन्यांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पण या शोसंदर्भात आणखी एक महत्त्वाचं गॉसिप म्हणजे या शोमध्ये 'गुथ्थी' अर्थात अभिनेता सुनील ग्रोवर () पुन्हा एकदा एन्ट्री करणार असल्याचं म्हटलं जात आहे. कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यामध्ये झालेलं भांडण सर्वश्रुत आहे. एकेकाळी छोट्या पडद्यावरची ही सुपरहिट जोडी होती. काही वर्षापूर्वी त्यांच्यात वादाची ठिणगी उडाली होती. त्यानंतर सुनीलनं कपिल शर्मा शोही सोडला. या जोडीनं त्यांच्यातले वाद मिटवून पुन्हा एकत्र यावं अशी चाहत्यांची इच्छा आहे. बॉलिवूडचा भाई अर्थात या दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्या प्रयत्नांना यश आल्याचंही म्हटलं जात असलं तरी याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सलमान खान 'द कपिल शर्मा शो'चा निर्माता असल्यानं कपिल आणि सुनीलनं एकत्र यावं अशी त्याची इच्छा आहे. त्यामुळं या दोघांना पुन्हा एकत्र छोट्या पडद्यावर घेऊन येण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत. पार्टीत दोघांची चर्चादोन वर्षांपूर्वी सोहेल खानच्या वाढदिवसानिमित्त गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये खास पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या पार्टीला कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर दोघांनीही हजेरी लावली होती. दरम्यान सलमाननं दोघांमध्ये समेट घडवून आणला आणि एक फोटोही क्लिक केला होता. अवघ्या काही मिनिटांत कपिल शर्मानं तो फोटो इन्स्टाग्रामवर पोस्टही केला होता.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3s7tY6R