Full Width(True/False)

कपूर कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर; वर्षभरात तीन भावंडांनी घेतला जगाचा निरोप

मुंबई: बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत राजीव कपूर यांचं आज निधन झालं. . चेंबूर इथल्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्नास घेतला. गेल्या काही महिन्यांत कपूर घराण्यातील अनेकांनी या जगाला निरोप दिला. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला, त्यानंतर अवघ्या काही महिन्यात कपूर कुटुंबियांना हा दुसरा धक्का सहन करावा लागत आहे. ऋषी कपूर अभिनेते आणि सदाबहार कलावंत ऋषी कपूर यांच्या निधनानं अवघ्या सिनेसृष्टीला आणखी एक मोठा धक्का बसला. गेल्या दोन वर्षांपासून ते कर्करोगाशी लढत होते. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना मुंबईतील एच. एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं . ३० ए्प्रिल रोजी गुरुवारी, सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. ते ६७ वर्षांचे होते. रितू नंदा ऋषी कपूर यांच्या निधनाच्या दोन महिन्यांपूर्वीच त्यांची मोठी बहिण रितू नंदा यांनी ७१ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. कर्करोगानंच रितू यांचं निधन झालं होतं. कृष्णा राज कपूर वर्ष २०१८मध्ये दिवंगत ज्येष्ठ अभिनेते राज कपूर यांची पत्नी कृष्णा कपूर (८८) यांचे वृद्धापकाळानं निधन झालं होतं. कृष्णा कपूर काही महिन्यांपासून आजारी होत्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शशी कपूर देखणा चेहरा आणि कसदार अभिनयाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीवर दीर्घकाळ अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं ४ डिसेंबर २०१७ रोजी ,सोमवारी संध्याकाळी ५.१५च्या सुमारास प्रदीर्घ आजारानं निधन झालं होतं. ते ७९ वर्षांचे होते. व्यावसायिक चित्रपटांमध्ये अभिनय, समांतर चित्रपटांची निर्मिती आणि पृथ्वी थिएटरच्या माध्यमातून नाट्यचळवळ उभी करणाऱ्या शशी कपूर यांनी चित्रपटसृष्टीत रसिकांचे प्रेम आणि प्रज्ञावंतांचा आदरही कमावला.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3a0aUBc