मुंबई- बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेता यांचं आज ९ फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते ५८ वर्षांचे होते. राजीव यांचा एक सिनेमाही ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. करोनाआधी हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. पण करोनानंतर सिनेमाच्या प्रदर्शनाची सर्व गणितं बदलली आणि सिनेमाच्या निर्मात्यांनी राजीव कपूर आणि स्टारर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. निर्मित '' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. काही महिन्यांपूर्वी आशुतोष यांनी या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं होतं. यात संजय दत्त, राजीव कपूर, वरुण बुद्धदेव आणि दिलीप ताहिल यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. किन्ही मृदुल दिग्दर्शित 'तुलसीदास ज्युनिअर' या चित्रपटाचं चित्रीकरण मागील तीन वर्षांपासून सुरू होतं. राजीव कपूर यांची महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहे. जवळपास ३० वर्षांपासून राजीव सिनेमांपासून दूर होते. या चित्रपटाच्या निमित्ताने आता त्यांच्या चाहत्यांना अखेरचं सिनेमात पाहण्याची संधी मिळेल. १९९० मध्ये त्यांनी 'जिम्मेदार' या सिनेमात अखेरचं काम केलं होतं. 'तुलसीदास ज्युनिअर' चित्रपट मागील वर्षी प्रदर्शित होणार होता. पण, आशुतोष यांनी 'पानिपत' च्या निर्मितीकडे लक्ष केंद्रित केल्याने तुलसीदासच्या चित्रीकरणासाठी पुरेसा वेळ ते देऊ शकले नाही. करोनाकाळात अनेकांनी आपले चित्रपट ओटीटीवर रिलीज केल्याने आशुतोष यांनीही आपला चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. यासंबंधी त्यांनी एक ट्वीट केलं होतं. यात त्यांनी लिहिलं होतं की, 'एका गाण्यासाठी मिळवलेला हात आता निर्मितीपर्यंत येऊन थांबला आहे. 'तुलसीदास ज्युनिअर' लवकरच येत आहे, तयार राहा.' या पोस्टसोबत त्यांनी चित्रपटाचं पोस्टरदेखील रिलीज केलं. ही कथा एका स्नूकर खेळणाऱ्या मुलाची असून संजय दत्त त्याच्या वडिलांची भूमिका साकारणार आहे. चित्रपटात आशुतोष यांचीही एन्ट्री असणार आहे. ते मुलाला हा खेळ शिकवणारे कोच असणार आहेत. तर दिलीप ताहिल चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत असणार आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3a2nIXG