Full Width(True/False)

शिवजयंती साजरी करावी तर सयाजी शिंदेंसारखीच, गडावर फडकवणार 'हिरव्या मशाली'

मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते मागच्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती आणि वृक्षारोपण करत आहेत. त्यामुळे त्यांचं हे काम एक लोकचळवळ म्हणून पुढे येत आहे. वृक्षरोपणासाठी सयाजी शिंदे कमालीचे आग्रही आहेत. यासाठी ते दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. यंदाही यांच्या जयंतीनिमित्तानं सयाजी शिंदे यांनी 'हिरव्या मशाली' हा नवा उपक्रम हाती घेतला आहे. सयाजी शिंदे यांच्या एका फॅनपेज त्यांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात सयाजी शिंदे त्यांच्या या नव्या उपक्रमाविषयी सांगताना दिसत आहेत. यंदाच्या शिवजयंतीला प्रत्येक गडावर ४०० झाडे लावण्याचा संकल्प सयाजी शिंदे यांनी केला आहे. तसेच या व्हिडीओच्या शेवटी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर हिरव्या मशाली दिसायल्या हव्यात आणि त्यासाठी प्रत्येकानं आपलं योगदान द्यायला हवं असं त्यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर शिवजयंतीला सयाजी शिंदे स्वतः पन्हाळगडावर वृक्षारोपण करणार आहेत असंही त्यांनी या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. 'सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात स्वराज्याचं स्वप्न पाहिलेले माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज. सोबतीला मावळे होते, या मावळ्यांना आणि राजांना झाडांनीही साथ दिली. सह्याद्रीच्या प्रत्येक झांडांचीही स्वराज व्हाव हीच इच्छा होती, पण पूर्ण सह्याद्री बोडका करुन टाकलाय आपण. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, झाडं म्हणजे रयतेची लेकरं, असं तळमळीनं सांगणाऱ्या महाराजांचं आपण ऐकणार आहोत की, नाही? आपण शिवरायांचे मावळे आहोत, येत्या शिवजयंतीला प्रत्येक गडावर ४०० झाडे लावण्याचा संकल्प आपण करुयात. यंदा गडावर मशाल घेऊन जाऊ, पण हिरवी मशाल.. झाडांची मशाल. कारण झाडाशिवाय गडाला शोभा नाही. जय शिवराय.' सयाजी शिंदे यांनी म्हटलं. पर्यावरण प्रेमी अभिनेता सयाजी शिंदे यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. सयाजी शिंदे पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपणाच्या बाबतीत नेहमीच आग्रही राहिले आहेत. अनेकदा त्यांनी याबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3aK235S