मुंबई: बॉलिवूड अभिनेता यांचं आज मुंबईमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यांच्या निधनाची माहिती त्यांचे मोठे भाऊ रणधीर कपूर यांनी दिली. राजीव कपूर हे प्रसिद्ध अभिनेता यांच्या मुलांमध्ये सर्वात लहान मुलगा होय. त्यांच्या मुलींनी बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं नाही मात्र तिनही मुलांनी मात्र अभिनय क्षेत्रात बरंच नाव कमावलं. राजीव कपूर हे भावांमध्ये सर्वात लहान मात्र वडील राज कपूर यांच्यासोबत त्यांचे संबंध चांगले नव्हते. राज यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्यातील दुरावा कायम राहिला. राजीव कपूर यांचा जन्म २५ ऑगस्ट १९६२ मध्ये मुंबईमध्ये झाला होता. राजीव यांनी आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात 'एक जान हैं हम' या चित्रपटापासून केली होती. मात्र १९८५ मध्ये रिलीज झालेल्या 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारली. त्यांना बॉलिवूडमध्ये ओळख तर याच चित्रपटानं मिळवून दिली मात्र या चित्रपटांमुळे बाप-लेकाच्या नात्यात मात्र कायमचा दुरावा निर्माण झाला. मधु जैन यांनी त्यांचं पुस्तक 'द कपूर्स' मध्ये राज कपूर आणि राजीव कपूर यांच्या नात्याविषयी लिहिलं आहे. त्यांच्या मते, राज कापूर यांनी आपला सर्वात लहान मुलगा राजीव कपूर यांना 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये लॉन्च केलं. चित्रपट हिट सुद्धा झाला पण तो राजीव यांच्या अभिनयामुळे नाही तर धबधब्याखाली अंघोळ करताना दिसलेल्या मंदाकिनीच्या सीनमुळे. एकीकडे या चित्रपटाची चर्चा दिवसेंदिवस वाढत होती आणि दुसरीकडे राज कपूर आणि राजीव कपूर यांच्या नात्यातला दुरावा वाढत चालला होता. मंदाकिनीचा तो सीन राज आणि राजीव यांच्या नात्यातील दुराव्याचं कारण ठरला. संपूर्ण चित्रपट केवळ मंदाकिनीच्या नावावर चालला. चित्रपट हिट झाला असला तरीही राजीव कपूर यांना त्याचा फारसा फायदा झाला नाही. एका चित्रपटानं एकीकडे मंदाकिनी यांना रातोरात स्टार केलं तर दुसरीकडे राजीव कपूर तिथल्या तिथेच राहिले. राजीव कपूर यांच्या मते या सर्व गोष्टींना त्यांचे वडील राज कपूर जबाबदार आहेत. राज कपूर यांनी 'राम तेरी गंगा मैली'नंतर आपल्यासाठी आणखी एक चित्रपट तयार करावा असं राजीव यांना वाटत असे. एक असा चित्रपट जो फक्त नायकाच्या नावावर चालेल आणि मंदाकिनीला जो फायदा मिळाला तो राजीव यांच्या चित्रपटाला मिळेल. राज कपूर यांनी मात्र मुलाच्या इच्छेप्रमाणे काहीच केलं नाही. याउलट त्यांना आपला असिस्टंट म्हणून कामाला घेतलं. राजीव कपूर त्यावेळी युनिटचं सर्व काम करत असत. जे काम स्पॉट बॉय आणि असिस्टंट करतात. 'राम तेरी गंगा मैली' नंतर राजीव कपूर 'लवर ब्वॉय', 'अंगारे', 'जलजला', 'शुक्रिया', 'हम तो चले परदेस' या चित्रपटांमध्ये दिसले. पण त्यांचे हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकले नाही आणि राज कपूर आणि राजीव कपूर यांच्यातील नातेसंबंध आणखी ताणले गेले. त्यांच्यातील हा दुरावा राज कपूर यांच्या निधनानंतरही संपला नाही. राज यांच्या निधनानंतर राजीव त्यांच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित राहिले नाही. एवढंच नाही तर वडिलांच्या निधनानंतर ते कुटुंबापासून दूर तीन दिवसांपर्यंत दारूच्या नशेत होते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2YW6uoF