मुंबई: डी. वाय पाटील विद्यापीठाच्यावतीने बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेता आर. माधवनला डॉक्टर ऑफ लेटर (डी लिट) ही पदवी प्रदान करण्यात आली. चित्रपट क्षेत्रातील त्यांचे अमूल्य योगदान आणि भावी पिढीला कला व माध्यमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरणा देण्यात त्याने बजावलेली भूमिका यामुळे त्याला ही पदवी देण्यात आली.. कोल्हापुरच्या डी. वाय पाटील एज्युकेशन सोसायटीतर्फे त्याचा सन्मान करण्यात आला. बुधवारी पार पडलेल्या दीक्षांत समारंभ पार पडला. या समारंभाचे फोटो माधवननं त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मिळालेल्या सन्मानाबद्दल माधवननं कृतज्ञता व्यक्त केली आहे. आता जबाबदारीही वाढल्याचं त्यानं म्हटलं आहे. बॉलिवूडच्या इतर सेलिब्रिटींनी माधवनचं भरभरून कौतुक केलं आहे. आर.माधवनचं कोल्हापूर कनेक्शन माधवनचा जन्म हा बिहारमधील जमशेदपूरमध्ये झाला असला तरी त्याचं शिक्षण महाराष्ट्रात झालं आहे. कोल्हापूरशी त्याचं विशेष नातं आहे.कोल्हापूरमधील राजाराम कॉलेजमध्ये त्यानें शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर काही काळ प्रोफेसर म्हणूनही काम केलं होतं. शिक्षणातही सुपरस्टार'रेहना है तेरे दिल मे' फेम . इलेक्ट्रॉनिक्समध्ये बॅचलर्स डिग्री घेतल्यानंतर त्यानं काही काळ रॉयल आर्मी, नौदल आणि हवाई दलामध्ये काही काळ प्रशिक्षण घेतलं आहे. कॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये येण्याआधी कॅनडामध्ये त्याने भारताचा सांस्कृतिक दूत म्हणून देशाचं प्रतिनिधीत्व केलं होतं. महाराष्ट्राचा सर्वोत्तम एनसीसी कॅडेट हा मान त्याला मिळाला आहे. माधवनच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर तो ' ' या चित्रपटामध्ये तो यांची भूमिका साकारतोय.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/37rEr59