Full Width(True/False)

माझा हिरो मला सोडून गेला, संदीप नाहरच्या आईला शोक अनावर

मुंबई- 'केसरी', 'एम एस धोनी' यासारख्या गाजलेल्या चित्रपटात अभिनय केलेला अभिनेता याने १५ फेब्रुवारी २०२१ रोजी त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. संदीपने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता, ज्यात त्याने पत्नी कंचन शर्मा आणि सासूवर छळवणुकीचा आरोप केला होता. संदीपच्या गावी कालका येथे त्याच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले. मंगळवारी संदीपचे शवविच्छेदन केल्यानंतर बुधवारी सकाळी त्याचे वडील विजय नाहर व अन्य नातेवाईकांनी त्याचा मृतदेह विमानाने चंडीगढला नेला. आपल्या मुलाचा मृतदेह पाहून संदीप यांच्या आईला शोक अनावर झाला. मुलाच्या मृतदेहाला बिलगून रडू लागल्या. रडताना संदीप यांच्या आईने एकचं टाहो फोडला. त्या वारंवार मुलाला हाक मारत होत्या आणि म्हणत होत्या, 'माझा हिरो मुलगा मला सोडून गेला, आता मी माझ्या मुलाला कशी भेटणार, मला मुंबईला फिरायला नेणारा स्वतःचं मला सोडून गेला.' तिथे उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. अनेकांनी संदीपच्या आईला सावरण्याचा प्रयत्न केला. संदीपच्या वडिलांनी कंचन शर्मा आणि तिच्या आईविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी संदीपची पत्नी आणि त्याच्या सासू विरोधात आयपीसी सेक्शन ३०६ (आत्महत्येला प्रवृत्त करणे) नुसार गुन्हा दाखल केला आहे. संदीपने त्याच्या व्हिडिओमध्ये वैयक्तिक आयुष्यातील समस्यांबद्दल खुलासा केला होता. त्याने म्हटलं होतं की, तो त्याच्या पत्नी आणि सासूच्या त्रासाला वैतागला आहे. आपल्या पत्नी आणि सासूवर गंभीर आरोप करत त्याने म्हटलं होतं, लग्न हा त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा चुकीचा निर्णय होता. तो मागील दोन वर्ष हा त्रास सहन करत होता परंतु, आता अती झाल्याने त्याने आत्महत्येचा पर्याय निवडला.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3s1V0we