Full Width(True/False)

Redmi Note 10 सीरीज लाँचिंग डेट कन्फर्म, 'या' दिवशी भारतात लाँच होणार

नवी दिल्लीः रेडमी नोट सीरीज भारतात खूप प्रसिद्ध आहे. आता या सीरीजचे पुढील व्हर्जन येणार आहे. चीनची स्मार्टफोन मेकर कंपनी शाओमीने Redmi Note 10 सीरीजच्या भारतातील लाँचिंज डेट कन्फर्म केली आहे. Redmi Note 10 ला ग्लोबली ४ मार्च रोजी लाँच करण्यात येणार आहे. भारतात याला १० मार्च रोजी लाँच केले जाणार आहे. वाचाः याआधी शाओमीने ही घोषणा केली होती की, Redmi Note 10 सीरीजला मार्च मध्ये भारतात लाँच केले जाणार आहे. शाओमी इंडियाचे एमडी मनू कुमार जैन यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. मनू कुमार जैन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की Redmi Note 10 सीरीजला ग्लोबली ४ मार्च रोजी लाँच केले जाणार आहे. बेस्ट मिड रेंज स्मार्टफोनसाठी काउंटडाउन स्टार्ट झाले आहे. १० ऑन १० साठी तयार राहा. ४ प्लस ३ प्लस २ प्ल्स १ या नंबर्सला जोडा आणि उत्तर सांगा. यावरून स्पष्ट होते की रेडमी नोट १० सीरीजला भारतात १० मार्च रोजी लाँच करण्यात येणार आहे. वाचाः Gizmo China च्या एका रिपोर्टमध्ये म्हटले की, रेडमी नोट १० सीरीजला भारतात १० मार्च रोजी लाँच करण्यात येणार आहे. याने अॅमेझॉनच्या लिस्टिंगचा हवाला देत भारतात या लाँचिंगचा खुलासा केला होता. लीक माहितीनुसार, कंपनी भारतात चार स्मार्टफोन लाँच करणार आहे. ज्यात Redmi Note 10 4G, Redmi Note 10 5G, Redmi Note 10 Pro 4G आणि Redmi Note 10 Pro 5G चा समावेश आहे. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, रेडमी नोट १० सीरीजमध्ये ऑक्टा - कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७३२ प्रोसेसर असणार आहे. वाचाः या फोनला ८ जीबी रॅम मध्ये लाँच केले जाऊ शकते. या फोनला पॉवर देण्यासाठी यात ५०५० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली जाऊ शकते. रेडमी नोट १० ला दोन व्हेरियंट मध्ये लाँच केले जाऊ शकते. ज्यात ४ जीबी रॅम सोबत ६४ जीबी स्टोरेज दिला जाऊ शकतो. तर ६ जीबी रॅम सोबत ६४ जीबी स्टोरेज दिला जाऊ शकतो. रेडमी नोट १० प्रोला तीन व्हेरियंट्स मध्ये लाँच केले जाऊ शकते. ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज, ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज याचा समावेश आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2OIHgIs