Full Width(True/False)

निशाण्यावर का आले तापसी - अनुराग, समजून घ्या संपूर्ण प्रकरण

मुंबई- २०११ साली सुरू झालेल्या याच्या व्यवहारात संशयास्पद गोष्टी आढळल्याने आयकर विभागाने प्रोडक्शन हाऊसचे मालक असलेल्या सर्व व्यक्तीच्या घरी धाड टाकली. यात विक्रमादित्य मोटवानी, , विकास बहल आणि मधु मंटेना यांचा समावेश होता. या प्रोडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट 'लुटेरा' होता. यात रणवीर सिंग आणि सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर त्यांनी 'मनमर्जियां' या चित्रपटाचीदेखील निर्मिती केली. या चित्रपटात , विक्की कौशल आणि अभिषेक बच्चन यांच्या मुख्य भूमिका होत्या. आयकर विभागाकडून मुंबई आणि पुणे येथे तब्बल ३० ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली. यात क्वान या प्रोडक्शन हाऊसचा देखील समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभाग सध्या कर चोरी प्रकरणात पुरावे गोळा करत असून त्यासाठी त्यांनी संंबंधीत कलाकारांच्या घरांवर छापे टाकत आहेत. त्यांच्यामते कंपनीच्या आर्थिक व्यवहारात घोटाळा झाला आहे आणि तसे पुरावेही त्यांच्या हाताला लागले आहेत. २०१५ साली रिलायन्स इंटरटेन्मेण्टने फॅन्टम फिल्म्समधील ५० टक्के शेअर्स खरेदी केले होते. या प्रोडक्शन हाऊसने 'लूटेरा', 'क्वीन', 'अगली', 'एनएच १०' आणि 'मसान' सारख्या चित्रपटांची निर्मिती केली होती. २०१८ साली मधू यांच्यावर लागलेल्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपांमुळे ही कंपनी बंद करण्यात आली. आयकर विभागाने कंपनीच्या मालकांवर आरोप लावले आहेत की या कंपनीच्या मिळकतीचा संपूर्ण हिशोब त्यांनी आयकर विभागाला दिलेला नाही आणि त्यात कमी कमाई झाल्याचं दाखवण्यात आले. अनुराग आणि मोटवानी यांनी त्यांच्या स्वतंत्र कंपन्या स्थापन केल्या. तर मधूने फॅन्टम फिल्म्सचे शेअर्स विकत घेऊन ही जुनी कंपनी नव्या कंपनीसोबत जोडली आणि ते रिलायन्स इंडस्ट्रीसोबत मिळून ही कंपनी चालवत आहेत. दरम्यान, बॉलिवूड कलाकारांच्या घरांवर पडणारे छापे म्हणजे केंद्र सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांचे आवाज बंद करण्याचा एक प्रयत्न असल्याचं वक्तव्य महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी केलं आहे. अनुराग आणि तापसी यांनी केंद्र सरकार विरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्याने हा प्रकार सुरु असल्याचं त्यांनी म्हटलं. मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सरकारची बाजू उचलून धरत आयकर विभाग मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करत असल्याचं म्हटलं. मागील वर्षी झालेल्या सीए आंदोलनादरम्यान अनुराग जेएनयू आणि शाहीन बाग येथेही पोहोचला होता. तर तापसीदेखील ट्विटरवर शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठिंबा देताना दिसली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/38dzi0J