Full Width(True/False)

फक्त ५ मिनिटात ३००००० जणांनी खरेदी केला स्मार्टफोन, पाहा फोनचे खास फीचर्स

नवी दिल्लीः शाओमीच्या फोनची विक्रीचा आणखी एक रेकॉर्ड बनवला आहे. शाओमीची सब ब्रँड कंपनी रेडमी ने आपली रेडमी के ४० सीरीजला लाँच केले आहे. सध्या या सीरीजला चीनमध्ये लाँच करण्यात आले आहे. रेडमी के ४० सीरीजला गेल्या महिन्यात चीनमध्ये लाँच केले होते. आता कंपनीने रेडमी के ४० वरून एक मोठा दावा केला आहे. पहिल्याच सेलमध्ये या सीरीजचे ३,००,००० लाख स्मार्टफोनची विक्री करण्यात आली आहे. वाचाः ३ लाख स्मार्टफोनची विक्री केवळ पहिल्या सेलमध्ये फक्त ५ मिनिटात झाली आहे. रेडमी के ४० सीरीजचे तीन स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहे. ज्यात Redmi K40, आणि Pro+ या स्मार्टफोनचा समावेश आहे. या फोनचा पुढचा सेल ८ मार्च रोजी होणार आहे. कंपनीने दावा केला आहे की, केवळ पाच मिनिटात या फोनची ३, ५० ००० मी ११ फोनची विक्री केली आहे. वाचाः Redmi K40, आणि Redmi K40 Pro+ तिन्ही स्मार्टफोनमध्ये अँड्रॉयड ११ वर आधारित एमआययूआय १२ दिले आहे. Redmi K40 मध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी अमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. डिस्प्लेमध्ये पंचहोल दिला आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८७० प्रोसेसर, १२ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबी पर्यंत स्टोरेज दिले आहे. या फोनमध्ये चार रियर कॅमेरे आहे. ज्यात ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. तर सेल्फीसाठी फोनमध्ये ४० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी ४५२० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. ३३ वॅट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे. वाचाः Redmi K40 Pro आणि Redmi K40 Pro+ च्या फीचर्स मधील क्वॉलिटी रेडमी के ४० सारखीच आहे. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर दिला आहे. रेडमी के ४० प्रो मध्ये ८ जीबी पर्यंत रॅम आणि Redmi K40 Pro+ फोनमध्ये १२ जीबी पर्यंत रॅम दिले आहे. Redmi K40 Pro+ फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. सेल्फीसाठी या दोन्ही फोनमध्ये ४० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. Redmi K40 Pro+ मध्ये प्रायमरी लेन्स १०८ मेगापिक्सलची आहे. या दोन्ही फोनमध्ये २५६ जीबी पर्यंत स्टोरेज आणि कनेक्टिविटी साठी सर्व आवश्यक फीचर्स दिले आहेत. फोनमध्ये ४५२० एमएएच क्षमतेची बॅटरी आणि ३३ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bltB31