नवी दिल्लीः जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही संधी तुमच्यासाठी चांगली आहे. अनेक स्मार्टफोन कंपन्या जसे, रेडमी, विवो, सॅमसंग मोटो आणि वनप्लसने आपल्या हँडसेटच्या किंमतीत कपात केली आहे. प्रसिद्ध रेडमी नोट ९ स्वस्त झाला आहे. तसेच फ्लॅगशीप वनप्लस ८ आणि वनप्लस ८ प्रो च्या किंमतीत कपात केली आहे. जाणून घ्या स्वस्त स्मार्टफोनविषयी. वाचाः रेडमी नोट १० सीरीजला देशात लाँच करण्यात आल्यानंतर रेडमी नोट ९ च्या दोन्ही व्हेरियंट्सच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. आता नोट ९ चा स्मार्टफोन ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबीच्या दोन्ही व्हेरियंट्सची किंमत कमी करण्यात आली आहे. हा फोन आता ११ हजार ९९९ रुपयांऐवजी १० हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकतो. ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजचा व्हेरियंटमध्ये १ हजार रुपयांची कपात करण्यात आल्यानंतर १३ हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकतात. वाचाः Moto Razr 5G मोटो रेजर ५जी एक फोल्डेबल फोन आहे. या फोनच्या किंमतीत १५ हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. आता या फोनला १ लाख ९ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकता येते. या फोनमध्ये ६.२ इंचाचा एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले दिला आहे. सॅमसंगने या फोनच्या किंमतीत कपात केली आहे. आता या फोनच्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनला २० हजार ४९९ रुपयात खरेदी करू शकता. तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनला १८ हजार ४९९ रुपयांत खरेदी करू शकता. OnePlus 8T चीनी कंपनी वनप्लस ने देशात आपला OnePlus 8T हँडसेट लाँच केला आहे. फोनच्या ६८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनला आता ४२ हजार ९९९ रुपये किंमतीऐवजी आता ३९ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. तर याच्या टॉप एन्ड १२ जीबी रॅम व २५६ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटला देशात ४२ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. वाचाः विवो व्ही २० एसई स्मार्टफोनच्या किंमतीत सुद्धा कपात करण्यात आली आहे. हँडसेटला ऑफलाइन आणि ऑनलाइन मध्ये खरेदी करू शकता. फोनचे ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज फोन आता १९ हजार ९९० रुपयांत उपलब्ध आहे. Redmi 9 Prime रेडमी ९ प्राइमच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. या फोनच्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनला ९ हजार ४९९ रुपये तर ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजचा फोन १० हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकता. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30jb29e