Full Width(True/False)

ट्वीटरमध्येही येणार अन डू सेंडचा पर्याय, युजर्संना हा फायदा होणार

मुंबईः लवकरच ट्वीटरवर जीमेलप्रमाणेच अन डू सेंडचा पर्याय उपलब्ध होणार आहे. अॅपचे रिसर्चर जेन वोंग यांनी दिलेल्या माहितीनुसार अन डू सेंड या नव्या पर्यायावर काम सुरू करण्यात आले आहे. या पर्यायाच्या मदतीने यूजर केलेली चूक सुधारू शकणार आहेत. हा पर्याय अस्तित्वात आल्यानंतर यूजरला ट्वीट दुरुस्त करता येणार आहे. मात्र, त्यासाठी काही सेकंदाचाच अवधी मिळणार आहे. वाचाः द व्हर्जच्या माहितीनुसार अन डू क्लिक केल्यानंतर एक पर्याय मिळेल. त्या पर्यायामुळे कोणताही मेसेज पाठविल्यानंतर किती वेळानंतर त्यात बदल करता येऊ शकेल, याची वेळ निश्चित केली जाऊ शकते. त्यामुळे कोणताही यूजर ट्विटमध्ये दुरुस्ती करू शकणार आहे. मात्र, त्यासाठी मर्यादित अवधीच उपलब्ध होणार आहे. यूजरने मेसेज पाठविल्यानंतर Send चे बटन दाबताच टायमरसह अन डू सेंडचा पर्याय स्क्रीनवर दिसू लागेल. मेसेज पाठविल्यानंतर यूजरला त्यात दुरुस्ती करावी वाटली, तर त्याला अन डू सेंडवर क्लिक करावे लागेल. दरम्यान, अन डू सेंडचा अवधी निघून गेल्यास ट्वीटमध्ये दुरुस्ती करता येणार नाही. यूजरला ट्वीटच्या दुरुस्तीसाठी नेमका किती वेळ मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ट्वीटची दुरुस्ती करण्यासाठी केवळ ३० सेकंदांचाच अवधी मिळण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षापासून अन डू सेंड या पर्यायाची चर्चा सुरू होती. वाचाः सध्या अन डू सेंडचा पर्याय केवळ जीमेलवरच उपलब्ध आहे. मेल पाठविल्यानंतर ही सुविधा उपलब्ध आहे. ई-मेल पाठविल्यानंतर खालील बाजूला डावीकडे अन डूची छोटी खिडकी दिसते. ही खिडकी जवळपास तीन सेकंद उपलब्ध होते. अन डूचा पर्याय क्लिक केल्यास मेल पुन्हा उघडतो. त्या वेळी त्यामध्ये आवश्यक ते बदल केले जाऊ शकतात. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3t3d4q8