Full Width(True/False)

मस्तच! गॉगलने करा कॉलिंग, गाणीही ऐका, पाहा किंमत

नवी दिल्लीः अमेरिकन टेक कंपनी रेजरने नव्या स्मार्ट ग्लासची (गॉगल) निर्मिती केली आहे. या गॉगलमध्ये बिल्ट इन स्पीकर, टक कन्सोल आणि ब्ल्यू लाइट फिल्टरचा अंतर्भाव करण्यात आला आहे. कंपनीने या उपकरणाला अंझू स्मार्ट ग्लास असे नाव दिले आहे. वाचाः हा गॉगल वर्तुळाकार आणि आयताकृती या दोन आकारांमध्ये सादर करण्यात आला असून, तो केवळ काळ्या रंगातच उपलब्ध आहे. सध्या हा गॉगल केवळ अमेरिकेतच उपलब्ध करून देण्यात आला आहे. या गॉगलची किंमत १९९.९९ डॉलर अर्थात १४,६०० रुपये आहे. हा गॉगल मोठ्या, मध्यम आणि छोट्या आकारात उपलब्ध करून देण्यात आला आहे. या गॉगलमध्ये बिल्ट इन स्पीकरशिवाय १६ एमएमचे ड्रायव्हरही देण्यात आले आहेत. याशिवाय हा गॉगल ब्ल्यूटूथने जोडला जाणार आहे. त्यामुळे कॉलही घेता येणार असून, संगीताचाही आनंद उपभोगता येणार आहे. वाचाः कंपनीने दिलेल्या माहितीनुसार गॉगलमध्ये आय प्रोटेक्शनचाही अंतर्भाव करण्यात आला आहे. गॉगल स्मार्टफोनशी जोडला गेल्यानंतर व्हॉइस असिस्टंटचेही नियंत्रण करता येणार आहे. या गॉगलमध्ये बिल्ट इन रिचार्जेबल बॅटरीही देण्यात आली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार एका चार्जमध्ये ही बॅटरी पाच तास कार्यरत राहील. गॉगलची घडी घातल्यास (फोल्ड केल्यास) तो आपोआप बंद होतो. हा स्मार्ट गॉगल वॉटरप्रुफ असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3epB8Q8