Full Width(True/False)

Samsung च्या या स्मार्टफोनला मिळाले One UI 3.1 अपडेट, आणखी नवीन फीचर आले

नवी दिल्लीः Samsung ने आपला पॉप्युलर मिड-रेंज स्मार्टफोन Galaxy M31s साठी अँड्रॉयड 11 वर बेस्ड One UI 3.1 अपडेट रोलआउट केले आहे. अपडेटचे वर्जन नंबर M317FXXU2CUB1 आहे. कंपनी याला बेजल मध्ये रोलआउट करीत आहे. १.९३ जीबी साइज असलेल्या या अपडेट मध्ये नवीन यूआय सोबत जबरदस्त स्टॉक अॅप, वन टाइम परमिशन, नोटिफिकेशन एरिया मध्ये कन्वर्सेशन सेक्शन आणि पॅरंटल कंट्रोल यासारखे फीचर्स दिले जात आहे. वाचाः सॅमसंगच्या या लेटेस्ट अपडेटचे खास वैशिष्ट्ये म्हणजे कंपनी या सोबत फेब्रुवारी २०२१ चे सिक्योरिटी पॅच सुद्धा ऑफर करीत आहे. डिव्हाइसवर अपडेट सोबत युजर्सला याचे नोटिफिकेशन मिळत आहे. युजरला फोनची सेटिंग मध्ये सॉफ्टवेयर अपडेट सेक्शन मध्ये जाऊन याला अपडेट किंवा चेक करू शकता. वाचाः गॅलेक्सी M31s चे फीचर फोनमध्ये 1080x2400 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. स्लीम बेजल आणि पंच होल डिस्प्ले डिझाइनच्या या फोनमद्ये आस्पेक्ट रेशियो २०.९ आहे. साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिले आहे. फोनमध्ये ८ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज दिले आहे. वाचाः गॅलेक्सी M31s मध्ये प्रोसेसर म्हणून Exynos 9611 चिपसेट दिले आहे. फोनच्या रियरमध्ये फोटोग्राफीसाठी चार रियर कॅमेरे दिले आहे. ज्यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, एक ५ मेगापिक्सलचा मायक्रो शूटर आणि एक ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे सेल्फीसाठी या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः या फोनला पॉवर देण्यासाठी फोनमध्ये 6000mAh ची पॉवर फुल बॅटरी दिली आहे. २५ वॉट ची फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये ड्यूल बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, 3.5mm हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप-C पोर्ट मिळते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3t0IRrY