Full Width(True/False)

आरशात पाहिल्यावर स्वतःचा तिरस्कार वाटायचा; इलियानानं शेअर केला आजारासंदर्भातला अनुभव

मुंबई: दाक्षिणात्य चित्रपटांनंतर बॉलिवूड चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचं कौशल्य दाखवणारी अभिनेत्री नेहमीच चाहत्यांसोबत वेगवेगळे व्हिडीओ, फोटो आणि त्यासोबतच मोटीव्हेशनल पोस्ट शेअर करत असते. इलियाना स्वतःच्या फिटनेसबाबात खूपच जागरुक असल्याचं तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून दिसून येतं. पण याशिवाय ती तिच्या पोस्टमधून मानसिक आरोग्याविषयी सुद्धा बोलताना दिसते. नुकतंच तिनं या आजारावर भाष्य केलं आहे. एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत बोलताना इलियानानं स्वतःलाही बॉडी डिस्मॉर्फिया हा आजार झाला होता असा खुलासा केला आहे. हा एक असा मानसिक आजार आहे ज्यात त्या व्यक्तीला स्वतःच्याच शरीरात अनेक व्यंग दिसू लागतात आणि व्यक्तीच्या मनात हळूहळू असुरक्षिततेची भावना निर्माण होते. कोणत्याही व्यक्तीनं स्वतःमधील लहान-मोठ्या सर्व गोष्टी स्वीकारायला हव्यात ज्यामुळे तो स्वतःला सुंदर आणि खंबीर समजू शकेल. इलियाना म्हणाली, या आजारपणात व्यक्ती नेहमीच स्वतःमध्ये काय कमी आहे हे शोधून दुसऱ्यांसोबत यावर चर्चा करत राहतात. या आजारपणात एक वेळ अशीही आली होती. जेव्हा मी आरशात स्वतःला पाहयचे तेव्हा मला स्वतःचा तिरस्कार वाटत आहे. स्वतःला पाहिल्यावर मला खूप वाईट वाटायचं. पण आता मी या सर्वांतून बाहेर पडले असून आता माझ्या मनात स्वतःबद्दल नकारात्मक भावना येत नाहीत. इलियानाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर लॉकडाऊनच्या अगोदर 'पागलपंती' चित्रपटात दिसली होती. लवकरच ती अभिषेक बच्चनसोबत द बिग बुल आणि रणदीप हुड्डासोबत अनफेअर अँड लवली या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2N0bLsY