Full Width(True/False)

आलियाचा 'गंगूबाई काठियावाडी' वादाच्या भोवऱ्यात, प्रदर्शनाआधीच चित्रपटाला विरोध

मुंबई: दिग्दर्शक यांचा बहुचर्चित चित्रपट ''ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सत्य घटनांवर आधारित असलेल्या चित्रपटात अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आणि आलियाच्या दमदार अंदाजानं सर्वांनाच आकर्षित केलं. येत्या ३० जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे पण त्याआधीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचं बोललं जात आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच संजय लीला भन्साळी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भन्साळी यांनी या चित्रपटात दाखवलेल्या अनेक गोष्टी चुकीच्या असून यातून आमच्या समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा कामाठीपुरा येथे राहणाऱ्या काही व्यक्तींनी केला आहे. तिथं काम करणाऱ्या 'कामाठीपुरा का आवाज' नावाच्या एका संघटनेनं या चित्रपटाच्या विरोधात आता आवाज उठवायला सुरुवात केली आहे. ते म्हणाले, कामाठीपुराशी जोडलेला इतिहास पुसण्यासाठी इथल्या लोकांनी खूप मेहनत केली आहे. त्यामुळे आता हा चित्रपट लोकांचं भविष्य तर खराब करेलच पण त्यासोबतच पुढच्या अनेक पिढ्यांवर याचा चांगला प्रभाव पडणार नाही. 'गंगूबाई काठियावाडी'च्या निर्मात्यांवर कामाठीपुराचा २०० वर्षं जुना इतिहास तोड-मोड करून चित्रपटात दाखवल्याचा आरोप आहे. चित्रपटात दाखवण्यात आलेली तथ्य ही फक्त चुकीचीच नाहीत तर त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. दुसऱ्यांच्या दुःखाचा वापर करून आपला फायदा करुन घेत असल्याचा आरोपही या चित्रपटाच्या निर्मात्यावर केला जात आहे. दरम्यान यावर चित्रपटाच्या टीमकडून किंवा संजय लीला भन्साळी यांच्याकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही. पण प्रदर्शनाआधीच या चित्रपटाच्या अडचणीत वाढ होत असल्याचं चित्र आहे. दरम्यान या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करणार असल्याचं या संघटनेनं सांगितलं आहे. ज्यात महिला आणि मुलांचाही समावेश असेल असं या संघटनेचं म्हणणं आहे. दरम्यान गंगूबाई काठियावाडी यांच्याबाबत बोलायचं तर त्या माफिया क्वीन म्हणून ओळखल्या जात होत्या. प्रियकराशी लग्न करुन गुजरातमधून मुंबईत आल्यानंतर त्यांच्या पतीनंच त्यांना अवघ्या ५०० रुपयांसाठी कोठ्यावर विकलं होतं. पुढे गंगूबाई सुद्धा कोठा चालवू लागल्या मात्र कोणत्याही मुलीला त्यांनी तिच्या इच्छेविरोधात जाऊन कोठ्यावर ठेवून घेतलं नव्हतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3kZ7jaj