Full Width(True/False)

दत्तक मुलांना वाऱ्यावर सोडलं का? वारंवार होणाऱ्या माही आणि जय भानुशालीने सोडलं मौन, म्हणाले....

मुंबई- टीव्ही अभिनेत्री आणि अभिनेता यांची जोडी छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय जोडी आहे. त्यांचे चाहते आजही त्यांच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. जय आणि माही यांची ओळख एका मालिकेदरम्यान झाली होती. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि २०१० साली त्यांनी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. २०१७ साली त्यांनी त्यांच्या कामवालीच्या दोन मुलांना ख़ुशी आणि राजवीर यांना दत्तक घेतलं. त्यानंतर त्यांनी घोषणा केली होती की, ते या दोघांवरही खूप प्रेम करतील आणि त्यांचा सगळा खर्च करतील. त्यानंतर २०१९ साली त्यांना मुलगी झाली. त्यावरून सोशल मीडियावर या जोडप्याला युजर्सनी ट्रोल केलं. ते दोघे दत्तक घेतलेल्या मुलांची जबाबदारी घेत नसल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला. शिवाय मुलगी झाल्याने त्या मुलांबद्दलचं त्यांचं प्रेम कमी झाल्याचं देखील बोललं गेलं. सोशल मीडियावर होणाऱ्या या आरोपांना अखेरीस उत्तर देण्याचं माही आणि जयने ठरवलं. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत या सर्व आरोपांचं खंडन केलं. महिने तिच्या इन्स्टाग्रामवर लिहिलं, 'अनेक जण प्रश्न विचारतायत, खूप सारे लोक अगदी काहीही बोलतायत, जे मुळात चुकीचं आहे. हो आम्ही पालक आहोत, आई- वडील आहोत. तारा एका सुंदर आशीर्वादाच्या रूपात आमच्या आयुष्यात आली आहे. पण त्यामुळे खुशी आणि राजवीर साठी असलेलं आमचं प्रेम बदलत नाही. जेव्हा खुशी आमच्या आयुष्यात आली तेव्हा आम्ही पालक बनलो, पण आम्हाला याची जाणीव आहे की, खुशीवर सगळ्यात पहिला अधिकार तिच्या आईवडिलांचा आहे.' माहीने म्हटलं, 'आमच्यासाठी सगळी मुलं एकसारखी आहेत. आज जेव्हा तुम्ही सगळे म्हणत आहात की, आम्ही त्यांना सोडलंय तर ते खरं नाहीये. आम्हाला हे वाचून दुःख होतं आणि मोठे झाल्यावर आमच्या मुलांवरही त्याचा वाईट परिणाम होईल. आमच्यासाठी तिन्ही मुलं सारखी आहेत. आम्ही त्यांच्यावर तितकंच प्रेम करतो. पण त्यातले दोघे सध्या त्यांच्या गावी आहेत. आम्ही त्यांना रोज व्हिडीओ कॉल आणि मेसेजच्या माध्यमातून भेटतो. हा एक असा निर्णय आहे, ज्यात आम्हाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही.' असं म्हणत तिने ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर वायरल होत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/30kj6GH