मुंबई- बॉलिवूडमधील सगळ्याचे लाडके अभिनेते सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांची फॅन फॉलोविंगही बरीच मोठी आहे. ते सोशल मीडियावर अनेक गोष्टी शेअर करत असतात. परंतु, इतर कलाकारांना जसा युजर्सच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागतो तसं बिग बींना देखील युजर्सच्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं. नुकतंच अमिताभ यांनी भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या टेस्ट क्रिकेट संदर्भात एक ट्वीट केलं होतं. या ट्वीटमधील छोट्याशा चुकीमुळे त्यांना ट्रोलर्सनी ट्रोल केलं. इंग्लंडसोबत सुरू असलेल्या मॅचमध्ये भारताने सलग दोन विजय मिळवले आहेत. अमिताभ यांनी सीरिजच्या शेवटच्या टेस्टच्या पहिल्या दिवशी असं काही ट्वीट केलं ज्यामुळे ते ट्रोल झाले. त्यांनी ४ मार्च २०२१ ही तारीख भारतीय गोलंदाजांच्या खेळाशी जोडत ट्वीट केलं आणि लिहिलं, 'किती आश्चर्याची गोष्ट आहे. भारतीय गोलंदाजांनी तारखेप्रमाणे विकेट घेतले. चार विकेट अक्षर पटेल, तीन विकेट आर अश्विन, दोन विकेट मोहम्मद सिराज आणि एक विकेट वॉशिंग्टन सुंदरने घेतली. म्हणजेच ४-३-२१.' महत्वाचं म्हणजे अमिताभ यांनी हे ट्वीट ५ मार्च रोजी केलं. अमिताभ यांचं हे ट्विट वाचून नेटकऱ्यांनी मीम्स शेअर करत त्यांना ट्रोल केलं. एका युजरने लिहिलं, 'माझ्या पंख्याचा रेग्युलेटर देखील ४-३-२-१ दाखवतो.' तर दुसऱ्या यूझर्सने 'हेराफेरी' सिनेमातील वाक्य शेअर करत लिहिलं की, मधील वाक्य लिहिलं, 'उठा ले रे देवा, उठा ले रे बाबा...' एका युजरने विचारलं, 'सरांना काय झालय?' एकाने अमिताभ यांचं ट्वीट कॉपी करत 'गँग्स ऑफ वासेपूर' मधील मीम वापरलं. आणखी एका युजरने त्यांची चूक लक्षात आणून देत म्हटलं, 'सर तुम्हाला हे ट्वीट टाकायला उशीर झालाय. तारीख बदलली आहे.' अशा प्रकारे अमिताभ यांना त्यांच्या चुकीच्या ट्वीटमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3quWpKN