मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री आणि निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या घरावर आयकर विभागाने ३ मार्च रोजी धाड टाकली होती. त्यात ३५० कोटींची हेराफेरी झाल्याची माहिती आयकर विभागाने दिली. शिवाय तापसीच्या नावावर पाच कोटींच्या रोख रकमेची पावती मिळाल्याचं देखील विभागाने स्पष्ट केलं. यासर्व प्रकारावर तापसीने शनिवारी ६ मार्च रोजी मौन सोडत उत्तर दिलं. तिने एकापाठोपाठ तीन ट्वीट करत तिची बाजू मांडली. तिने ट्वीटमध्ये मी आता स्वस्त राहिली नाही, असं म्हणत कंगना रणौतवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. त्यावर कंगनाने ट्वीट करत तिला प्रत्युत्तर दिलं आहे. कंगनाने नेहमीच ट्विटरवर तापसीचा एक स्वस्त अभिनेत्री म्हणून उल्लेख केला आहे. त्याला उत्तर देत तापसीने तीन मुद्दे मांडत स्पष्टीकरण दिलं. तिने म्हटलं, 'तीन दिवसांच्या या शोधमोहिमेमध्ये तीन गोष्टी प्रामुख्याने समोर आल्या. पहिली म्हणजे पॅरिसमध्ये माझ्या एका काल्पनिक बंगल्याची चावी मिळाली आहे, कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्या जवळ येत आहेत. दुसरी, मी कधीही न घेतलेल्या पाच कोटी रुपयांची पावती मिळाली आहे आणि तिसरी, माननीय अर्थमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे, २०१३ साली माझ्या घरावर आयकर विभागाची धाड पडली नव्हती. मी आता स्वस्त राहिले नाही' असं म्हणत तिने कंगनाला सुनावलं होतं. तापसीच्या या ट्वीटवर कंगनाने तिला उत्तर दिलं. तिने लिहिलं, 'तू नेहमी स्वस्तच राहणार, कारण तू या सर्व रेपिस्टच्या हक्कांचा पुरस्कार करणारी व्यक्ती आहेस. तुमचा रिंग मास्टर अनुराग कश्यपवर देखील २०१३ साली आयकर विभागाची धाड पडली होती. सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांचे रिपोर्ट दिले आहेत. जर तू दोषी नाहीयेस तर कोर्टात जा आणि स्वतःला निर्दोष सिद्ध कर.' असं ट्वीट करून कंगनाने पुन्हा एकदा तापसीला डिवचलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3rr4ktQ